Delhi Shaurya Patils Death Case : शौर्य पाटीलने आत्महत्या केली. परंतु अद्याप कोणालाही अटक झाली नाही. यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांची आज भेट घेतली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke), खासदार भास्कर भगरे हे यावेळी सोबत होते. रेखा गुप्ता यांनी स्वतःच्या फोनवरून पोलिस आयुक्तांना फोन लावलाय. सुसाईड नोटचे पुरावे असताना कारवाई का केली नाही? असा सवाल रेखा गुप्ता यांनी पोलिस आयुक्तांना विचारलाय. आम्ही तपास करत असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितले. त्यावर 22 दिवस झाले तरी तपास सुरूच आहे का? असा सवाल देखील रेखा गुप्ता यांनी पोलिस आयुक्तांना विचारला. अशी माहिती शौर्य पाटीलचे वडील प्रदीप पाटील यांनी दिली.
दिल्लीतील (Delhi) सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. शौर्य प्रदीप पाटील (Shaurya Patil), असे पीडित विद्यार्थ्याचे नाव असून तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता. शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली (Sangli) जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसाय निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीव नगर भागात भागात वास्तव्यास होता. या प्रकरणी शौर्य पाटीलचे वडील प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली आहे.
Pradeep Patil : प्रकरणाच्या तपासात पोलिसांचा अजिबात सपोर्ट नाही
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांचा अजिबात सपोर्ट नाही. शाळेनं आमच्याशी संपर्क साधला नाही. एज्युकेशन डिपार्टमेंटच्या डायरेक्टर सोबत रेखा गुप्ता यांनी चर्चा केली. मिशनरी शाळेवर काही कारवाई करायची नाही का? असा सवाल रेखा गुप्ता यांनी शिक्षण विभागाला केलाय. शासनाच्या अखत्यारीत या शाळेला घेण्याचे निर्देश दिले आहेत. शाळेवर तात्काळ कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. आम्ही प्रत्येक बाजूनं लढत आहोत. आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा असल्याचेही प्रदीप पाटील म्हणाले.
आणखी वाचा