एक्स्प्लोर

शेअर बाजार कोरोनाग्रस्त, सेन्सेक्स 2300 अंकांनी कोसळला

बुधवारी मुंबई शेअर बाजार बंद झाला तेव्हा निर्देशांक, 35,697 एवढा होता. आज सकाळी सुरुवातीलाच बाजारात 1600 अंकांची घसरण पाहायला मिळाली.

मुंबई : कोरोना व्हायरसचे गंभीर परिणाम जगभरात धुमाकुळ घातला आहे. आता त्याचा शिरकाव आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही पाहायला मिळत आहे. याचा परिणाम आज थेट शेअर बाजारात दिसून आला. कोरोना आणि आंतरराष्ट्रीय बाजारातली घसरण यामुळे शेअर बाजारही गडगडला. सेन्सेक्स 2300 पेक्षा जास्त अंकांनी तर निफ्टी 700पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला महारोगराई जाहीर केल्यानंतर जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरल आहे. त्यातच भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचा फटकाही शेअर बाजाराला बसला आहे. दरम्यान, बुधवारी मुंबई शेअर बाजार बंद झाला तेव्हा निर्देशांक, 35,697 एवढा होता. आज सकाळी सुरुवातीलाच बाजारात 1600 अंकांची घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समधील पाच वेगवान शेअर हीरो मोटोकॉर्प (4.08 टक्के) रिलायन्स (3.60 टक्के) आयसीआयसीआय बँक (1.80 टक्के) हिंदुस्तान यूनिलीवर (1.47 टक्के) एल अँड टी (1.35 टक्के) #Coronavirus | शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 1200 अंकानी कोसळला कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित कोरोना व्हायरस जगातील 100 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसने जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसंच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे. परदेशातून येणाऱ्यांचे व्हिसा रद्द परदेशातून भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत सस्पेंड करण्यात आले आहेत. यामधून राजनीतीज्ञ आणि यूएन कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून येणारे भारतीय 14 दिवसांसाठी देखरेखीखाली असतील. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आयोगने 13 मार्च रोजी होणारी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबतची बैठक रद्द केली आहे. एअर इंडियाने इटलीला जाणारी विमानं 28 मार्च आणि दक्षिण कोरियाला जाणारी विमानं 25 मार्चपर्यंत रद्द केली आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 827 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 12462 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget