नवी दिल्ली : भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव म्हटल्यानंतर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्रयिचा एक चेहरा येतो. त्यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवसाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतोय. 


देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं आहे. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव त्यातील अग्रणी. इंग्रजी सरकारच्या 'पब्लिक सेफ्टी बिल अॅन्ड ट्रेड डिस्ट्रिब्यूशन बिल' च्या विरोधात भगतसिंहांनी सेट्रंल असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला होता. त्यावेळी त्यांनी स्वत: ला पोलिसांच्या हवाली केलं. 


लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकारी सॉन्डर्सला गोळ्या घातल्या. नंतर या प्रकरणाचा ठपका ठेऊन भगतसिंहावर खटला चालवण्यात आला. या प्रकरणात भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याची अंमलबजावणी 23 मार्च 1931 साली करण्यात आली. हाच दिवस देशात शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतोय. 


भगतसिंह लहान असताना 1919 साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी शस्त्राच्या बळावर इंग्रजी व्यवस्था उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. भगतसिंहावर रशियन राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव होता. भारतातही स्वांतत्र्यांनंतर समाजवाद रुजला जावा यासाठी ते प्रयत्नशील होते. ते केवळ एक क्रांतीकारक नव्हते तर एक विचारक आणि संवेदनशील मनाचे व्यक्तीदेखील होते. 


भगतसिंहांवर त्यांचे काका अजितसिंह आणि लाला लजपत राय यांच्या क्रांतीकारी कार्याचा प्रभाव होता. सुखशाही कुटुंबात वाढलेल्या भगतसिंहांनी सर्व सुखांचा त्याग करुन लहान असतानाच आपले जीवन देशासाठी अर्पण करायचं ठरवलं होतं. त्यांच्या कार्याने पुढच्या काळात अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली.


संबंधित बातम्या :