एक्स्प्लोर
अंतरिम बजेटपूर्वी शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 106 अंकांनी वाढला
देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. निर्देशांक सेंसेक्स शुक्रवारी सकाळी 9.42 वाजता 106.88 अंकांनी वधारून 36,363.57 वर आणि निफ्टीदेखील जवळपास याच वेळी 33.50 अंकांच्या तेजीसह वधारल्याचे दिसून आले.
मुंबई : देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. निर्देशांक सेंसेक्स शुक्रवारी सकाळी 9.42 वाजता 106.88 अंकांनी वधारून 36,363.57 वर आणि निफ्टीदेखील जवळपास याच वेळी 33.50 अंकांच्या तेजीसह वधारल्याचे दिसून आले.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) च्या 30 शेअर्सवर आधारित निर्देशांक सेन्सेक्स सकाळी 55.05 अंकांच्या मजबुतीसह 36,311.74 वर पोहोचला. त्याचवेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या 50 शेअर्सवर आधारित निर्देशांक निफ्टी 20.4 अंकांनी वाढून 10,851.35 इतका झाला.
प्रामुख्याने हिरो मोटोकॉर्प, एचसीएल, भारती एयरटेल, बजाज फाइनान्स, इन्फोसिस, एचडीएफसी, हिंदुस्तान यूनिलीव्हर, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, लार्सन-टुब्रो, आईटीसी आणि मारुती या कंपन्यांना याचा लाभ झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement