पणजी : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी हात स्वच्छ राहावे यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस सॅनिटायझरच्या मागणीत वाढ झाली आहे. लोकांच्या या गरजेचा गैरफायदा घेत बनावट सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वजन माप खात्याने विविध ठिकाणी कारवाई करून बनावट मास्क तसेच सॅनिटायझर मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे. खात्याने राज्यभरातून 806 साध्या पध्दतीचे मास्क तर 195 एन 95 मास्क जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले मास्क साध्या प्लास्टिक पिशवीत बंद केले होते आणि त्याच्यावर कोणतीही माहिती नसल्याने खात्याने ही कारवाई केली आहे.


कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मास्कचा वापर करा, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा असे सरकारकडून आदेश जारी केले आहेत. गोव्यात सध्या मास्क व सॅनिटायझर उपलब्ध नसल्याने लोक धावपळ करताना दिसत आहे. याचाच फायदा घेऊन बनावट मास्क व सॅनिटायझर विकण्याचे प्रकार होत आहेत. वजन माप खात्याने असे बनावट मास्क व सॅनिटायझर जप्त करून विक्रेत्याला दंड ठोठावणे सुरु केले आहे.


WEB EXCLUSIVE | 1,82,457 कोरोना बाधितांपैकी 79,881 रुग्ण खडखडीत बरे कसे झाले?




डिचोली येथे केलेल्या कारवाईत 5 एन 95 मास्क जप्त करण्यात आले आहेत. म्हापसा येथे 485 साधे मास्क तसेच 11 एन 95 मास्क जप्त केले आहेत. पणजी येथे 33 साधे मास्क जप्त केले आहेत. मडगावात 190 एन 95 मास्क जप्त केले आहेत. फोंडा येथून 132 साधे मास्क तर 54 एन 95 मास्क जप्त केले आहेत. कुडचडेत 153 साधे मास्क जप्त केले आहेत.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | तुमच्या घरी येणाऱ्या न्युजपेपरवर कोरोना व्हायरस तर नाही?


Coronavirus | कोरोनाच्या महामारीत तुम्ही निवांत फिरताय? इटालियन नागरिकाचा हा भीषण अनुभव नक्की वाचा


Coronavirus | पुण्यातील बनावट सॅनिटायझरचे मुंबई कनेक्शन


Coronavirus | पुण्यात बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्या तिघांना अटक