देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये


1. नेहमीच्या तुलनेत मुंबईतील विविध रेल्वे स्टेशनवर कमी गर्दी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता, प्रवास टाळण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आवाहन


2. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दोनने वाढ, संख्या 41 वर तर देशभरात 137 जणांना लागण, सरकारकडून विशेष खबरदारी


3. चीननंतर आता इटलीत कोरोनाचा धुमाकूळ, अडीच हजार जणांचा मृत्यू, जवळपास 28 हजार जणांना कोरोनाची बाधा, जगभरात 7 हजार 976 जण मृत्युमुखी


4. गंभीर गुन्हे नसलेल्या कैद्यांची जामीनावर सुटका होण्याची शक्यता, कोरोनामुळे तुरुंग प्रशासनाची खबरदारी, कैद्यांची यादी तयार करण्याचं काम सुरु


5. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं आणि हॉटेल्स बंद तर मुंबईतही दुकानं बंद ठेवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन


6. एसटी महामंडळाही कोरोनाचा फटका, शिवनेरी बससेवेचं सर्वाधिक नुकसान, हजारो फेऱ्या रद्द केल्याने एकाच दिवशी सुमारे दीड कोटी रुपयांचं उत्पन्न बुडालं


7. भारतीय सैन्यातील जवानाही कोरोनाची लागण, इराणवरुन परतलेल्या वडिलांच्या संपर्कात आल्याने सैनिकाला संसर्ग झाल्याची माहिती


8. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्देश असतानाही अनावश्यक याचिका सादर करणाऱ्याला हायकोर्टाकडून 15 हजारांचा दंड, गर्दी टाळण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचिका सादर करण्याचीही सूचना


9. धुळ्याच्या शिरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, एकाचा मृत्यू, तर औरंगाबादच्या फुलंब्री, वैजापूर तालुक्यातल्या गारपिटीने पिकांचं नुकसान


10. डॉक्टर होण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना खूशखबर, देशभरातील मेडिकलच्या जागा हजारोंच्या संख्येने वाढणार, मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाची प्रस्तावाला मंजुरी