पोलिसांनी शनिवारीही दत्तवाडी परिसरात बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या तीन व्यक्तींना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपींची अधिक चौकशी केली असता पराग दोषी आणि हरेश बेरा या दोघांची नावे समोर आली होती. पोलिसांनी त्यांना अटक करून अधिक चौकशी केली असता मुंबईतील साकिनाका येथे कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमने साकिनाका येथील कारखान्यावर छापा मारला.
Corona | कोरोनाचा गैरफायदा घेत बोगस सॅनिटायझरची विक्री, मुंबईतून लाखोचं बनावट सॅनिटायझर जप्त
साकिनाका येथील एका घरात हा कारखाना तयार केला होता. त्यासाठी त्यांनी रिकाम्या बाटल्या आणि नामांकित कंपन्यांचे स्टिकर वापरले. आरोपींनी मुंबईतील एका कंपनीतून पाच लिटरचे कॅन आणले व त्यातून छोट्या बाटल्या तयार केल्या. त्यानंतर हे सॅनिटायझर शहरातील लोकल मार्केटमध्ये विकण्यात आले. कोरोनाचा फायदा घेत हे रॅकेट उदयास आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींनी तीन दिवसांची कोठडी
अजय शंकरलाल गांधी, मोहन चौधरी, सुरेश छेडा अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. या त्रिकुटाने 1 लाख 2 हजार 419 रुपये किंमतीचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवले होते. आरोपींनी यासाठी घरातल्या घरात कारखाना तयार केला होता. त्यासाठी त्यांनी रिकाम्या बाटल्या आणि नामांकित कंपन्यांचे स्टिकर वापरले. आरोपींनी मुंबईतील एका कंपनीतून पाच लिटरचे कॅन आणले व त्यातून छोट्या बाटल्या तयार केल्या. त्यानंतर हे सॅनिटायझर शहरातील लोकल मार्केटमध्ये विकण्यात आले. कोरोनाचा फायदा घेत हे रॅकेट उदयास आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Coronavirus | राज्यभरात कोरोना इफेक्ट! शहरांमधून गावाकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये गर्दी