Seema Sachin Love Story : गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानातून भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीना (Sachin Meena) यांची प्रेमकहाणी चर्चेत आहे. ही पाकिस्तानी महिला खोटं बोलत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिन मीना यांनी नेपाळमधील पशूपती नाथ मंदिरात लग्न केल्याचा दावा सुरुवातीपासून केला होता, पण हा दावा खोटा ठरला आहे. सीमा हैदर आणि सचिन यांची नेपाळमध्ये पहिली भेट झाली आणि तेथेच त्यांनी लग्न केल्याचा या दोघांचा दावा आहे. पण, या दोघांच्या लग्नाबाबत आता एक आणखी मोठी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 


सीमा आणि सचिनच्या लग्नाबाबत मोठी माहिती


सचिन आणि सीमा हैदरबाबत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. यामध्ये आता हे दोघंही खोटे बोलत असल्याचं उघड झालं आहे. आहेत. या दोघांनी नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात लग्न केल्याचा दावा केला होता. पण, आता समोर आलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरामध्ये लग्न होत नसल्याची माहिती उघड झाली आहे. यावरून सीमा आणि सचिन खोटं बोलत असल्याचं सत्य समोर आलं आहे. एवढंच नाही तर आतापर्यंतच्या एटीएस तपासात अनेक बाबीवरून पडदा उघडला असून सीमा अनेक बाबतीत खोटं बोलल्याचं तपासात आढळलं आहे. यूपी पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाकडून दोघांची (एटीएस) चौकशी सुरू आहे.


सीमा हैदर आणि सचिन धादांत खोटं बोलतायत



  • पाकिस्तानी सीमा हैदरने दावा केला होती की, तिने सचिनसोबत नेपाळमधील पशूपतीनाथ मंदिरात लग्न केलं. पण, पशूपतीनाथ मंदिरामध्ये विवाह होऊ शकत नसल्याचं तपासात समोर आलं आहे.

  • सचिनने सांगितलं होतं की, तो नेपाळमधील हॉटेलमध्ये थांबला होता. मात्र, तपासात तो खोट्या नावाने या हॉटेलमध्ये थांबल्याचं आढळून आलं.

  • सीमा-सचिनने जामिनासाठीही कोर्टात खोटं बोलल्याचा आरोप आहे.

  • सीमा हैदरने नेपाळ सीमेवरून एंट्री कशी घेतली याबद्दल खोटी माहिती दिली आहे.

  • सीमाने पाकिस्तानातील तिच्या पतीला खोटे सांगितले की, ती तिच्या गावी जात आहे, तर तिथून ती दुबईला गेली आणि नंतर पुन्हा ती पाकिस्तानमधून भारतात आली.


पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन मीनाची लव्हस्टोरी


पबजी गेममुळे पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतातील युवक सचिन यांची ओळख झाली. या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. यानंतर सचिनला भेटण्यासाठी सीमा हैदर तिच्या चार मुलांसह सीमेपलिकडे भारतात आली. या दोघांच्या प्रेमकहाणीची बरीच चर्चा आहे. वर-वर पाहात ही एखादी बॉलिवूडची लव्ह स्टोरी वाटत असली तरी यामुळे देशाच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. सीमा हैदर अवैधरित्या घुसखोरी करत भारतात आली, हे असं पहिलं प्रकरण नाही. 


संबंधित इतर बातम्या : 


Seema Haider : सीमा हैदर भारत आणि पाकिस्तानची फसवणूक करतेय, पाकिस्तानी मैत्रिणीचा गौप्यस्फोट; म्हणाली...