Vegetables rates : सध्या देशातील विविध राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. विशेषत उत्तर भारतात (North India) या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर काही भागात पूरसृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळं भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याचा परिणाम भाज्यांच्या दरावर होत आहे. सध्या टोमॅटोच्या दरात मोठी तेजी असल्याचं चित्र दिवत आहे. आता टोमॅटोप्रमाणेच (Tomato Price) अन्य भाज्यांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारणा पावसामुळं शेतकऱ्यांजवळील भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं बाजारात कमी शेतमाल आल्यानं तुटवडा भासून त्याचा परिणाम दरांवर होत आहे. 


पावसामुळे शेतजमीन पाण्याखाली 


अनेक राज्यात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भाजीपाला पिकावर परिणाम झाला आहे. पिकांचं अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. त्यामुळं भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. सध्या टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचबरोबर भेंडी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, कोबी, दोडका या भाज्यांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबले आहे. जास्त पाण्यामुळं काही भागात पिकं वाहून गेली आहेत. तर पाणी साचलेल्या शेतात, जमिनीच्या आत असलेला ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळं झाडे कोमेजून पाने पिवळी पडतात. दोन दिवसांपेक्षा जास्त पाणी शेतात राहिल्यास संपूर्ण पिकाची नासाडी होते. जोपर्यंत शेतातून पाणी जात नाही तोपर्यंत नवीन भाजीपाला रोपांची लागवड करता येणार नाही. त्यामुळं भाजीपाल्यांचे दर चढे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पावसाळ्यात भाजीपाला महाग


दरवर्षी पावसाळ्यात भाजीपाला महागतो. मात्र यंदाही जास्त असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वीच्या तुलनेत निम्म्या भाजीपाला खरेदी करुनच लोक आपला व्यवसाय चालवत आहेत. अनेकजण महागड्या भाज्या खरेदी न करता कडधान्य, सोयाबीन, राजमा, बटाटे इत्यादींचा वापर करुन आपला खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महागड्या भाजीपाल्याचा सर्समान्यांनांच नाही तर भाजी विक्रेत्यांनाही परवडत नाही. कारण या भाजीपाल्याची विक्री न झाल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पावसामुळं भाजीपाला लवकर खराब होण्याची भीतीही आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


लातुरातील वडवळ नागनाथ गावात दरवर्षी 100 कोटींच्यावर उत्पन्न, पण यंदा टमाटेच लावले नसल्याने बसला आर्थिक फटका