मुंबई: सचिनच्या प्रेमाखातर पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सचिन (Sachin Meena) आणि सीमाच नव्हे तर त्यांच्यावर टीका करणारी महिला मिथिलेश भाटी ही देखील चर्चेत आली आहे. 'लप्पू सा सचिन, झिंगुर सा लडका' म्हणणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पण आता ही महिला अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण सचिनवर केलेल्या टीकेवर आता सीमा हैदर कायदेशीर कारवाई करण्याची, मानहानीचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे.
सीमा हैदरच्या वकिलाने तिची शेजारी मिथिलेश भाटी या महिलेला मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती सीमा हैदरचा नवरा सचिन मीनाला 'लप्पू' आणि 'झिंगूर' म्हणत आहे.
सीमाचे वकील एपी सिंह म्हणाले की, मिथिलेश भाटी यांनी सचिनबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल त्यांना देशातील प्रत्येक पतीकडून उत्तर मिळेल. ही टिप्पणी म्हणजे सर्व पतींचा अपमान असल्याचे एपी सिंग यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, "त्वचेचा रंग आणि शारीरिक दोषांच्या आधारे केलेला अपमान आपल्यासारख्या वैविध्यपूर्ण देशात सहन केला जाऊ शकत नाही. आम्ही या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहोत.
Mithilesh Bhati : मिथिलेश भाटी सोशल मीडियावर व्हायरल
मिथिलेश भाटी या महिलेने मीडियाला दिलेल्या मुलाखतीतही सचिनला 'झिंगूर सा लडका' आणि 'लप्पू सा सचिन' म्हटले होते. या मुलाखतीनंतर मिथिलेश रातोरात व्हायरल झाली, सोशल मीडियावर तिचा चांगलाच बोलबाला झाला.
कोणाचाही अपमान केला नाही
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मिथिलेश भाटी म्हणाल्या की, मी कोणाचाही अपमान केलेला नाही. मला राग आला आणि माझ्या तोंडून हे शब्द बाहेर पडले. सहसा अशी भाषा आपल्या बोलीभाषेत वापरली जाते. लोक मला 'लप्पी' म्हणतात, पण याचा अर्थ असा नाही की मी 'लप्पी' होईन. मी कोणाचाही अपमान केलेला नाही.
Seema Haider - Sachin Meena Love Story : काय आहे प्रकरण?
सीमा हैदर नावाची पाकिस्तानी महिला आपला भारतीय प्रियकर सचिन मीनाला भेटण्यासाठी सीमा ओलांडून आली होती. 2019 मध्ये ऑनलाइन गेम PUBG खेळताना त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. सीमा या वर्षी जुलैमध्ये आपला देश सोडून अवैधरित्या भारतात पोहोचली. ती आधीच विवाहित होती आणि तिला चार मुले आहेत.
Lappu Sa Sachin Remark : 'लप्पू सा सचिन' व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, सचिनच्या शेजारी राहणाऱ्या मिथिलेश भाटी या महिलेचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. व्हिडीओ क्लिपमध्ये या महिलेने दाम्पत्याला फटकारले आणि दावा केला की सचिनमध्ये असे काहीही नव्हते ज्यामुळे सीमाला पाकिस्तानमधून भारतात येण्यास भाग पाडले. तिच्या टिपण्णीदरम्यान तिने 'लप्पू सा सचिन' हा वाक्प्रचार वापरला आणि तो व्हायरल झाला.
ही बातमी वाचा :