एक्स्प्लोर

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने निर्बंधांना सुरुवात; कोणत्या शहरात कर्फ्यू, कुठे शाळा बंद?

देशभरात दिवाळीनंतर कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता काही राज्यांनी संचारबंदी लावण्यास सुरुवात केली आहे. तर काही शहरात शाळा बंद ठेवण्याचा कालावधी वाढवला आहे.

नवी दिल्ली : देशभरात दिवाळीनंतर कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता काही राज्यांनी संचारबंदी लावण्यास सुरुवात केली आहे. गुजरातच्या अहमदाबाद आणि मध्य प्रदेशातील पाच शहरांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तर काही राज्यांमध्ये शाळा आणि बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अहमदाबादमध्ये 57 तासांची संचारबंदी दिवाळीदरम्यान आणि त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर गुजरात सरकारने अहमदाबादमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. अहमदाबाद शहरात शुक्रवारी (20 नोव्हेंबर) रात्री 9 वाजल्यापासून सोमवारी (23 नोव्हेंबर) सकाळी सहा वाजेपर्यंत 57 तासांची संचारबंदी असेल. मात्र गुजरात सरकारने कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यास नकार दिला आहे. आम्ही राज्यव्यापी लॉकडाऊनवर विचार करत नाही, असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सांगितलं.

मध्य प्रदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये आजपासून कर्फ्यू मध्य प्रदेशच्या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा रात्रीचा कर्फ्यू शनिवारी (21 नोव्हेंबर) रात्रीपासून सुरु होईल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी (20) कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी केली होती.

चौहान म्हणाले की, "राज्याच्या भोपाळ, इंदूर, विदिशा, रतलाम आणि ग्वालियर या पाच राज्यांमध्ये शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी सह वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू असेल." रात्रीत संचारबंदी लागू होत असला तरी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होमार नाही. सोबतच औद्योगिक युनिट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अडचण येणार नाही. राज्या शाळा आणि कॉलेज बंद राहतील. तर नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शाळेत जाऊ शकतात.

हरियाणा आणि मुंबईत शाळा बंद हरियाणा सरकारने मागील महिन्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. पण हरियाणाच्या अनेक शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या शिक्षण विभागाने या संदर्भात नियमावली जारी केली. नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 2 नोव्हेंबरला शाळा पुन्हा सुरु केल्या होत्या.

तर दुसरीकडे कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असेलल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आता 31 डिसेंबरपर्यंत सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा बंद राहणार आहेत. दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा झालेली वाढ लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने याबाबत आदेश दिले आहेत.

राजस्थानमध्ये कलम 144 राजस्थान सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 21 नोव्हेंबरपासून कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्याची सूचना दिली आहे. गृह विभागाच्या ग्रुप-9 च्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निर्देश जारी केले आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राजस्थानमध्ये थंडीसोबतच नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्याही वाढण्यास सुरु झाली आहे. राजस्थानमध्ये 19 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच एका दिवशी अडीच हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

गर्दीने लावली वाट, आता कोरोनाची दुसरी लाट? दिल्ली, अहमदाबाद, मध्य प्रदेशात निर्बंध वाढले

महत्त्वाच्या बातम्या

एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
Embed widget