एक्स्प्लोर

VVPAT पावत्यांची पडताळणी करण्याची मागणी फेटाळली

कमीत कमी 25 टक्के VVPAT पावत्यांना ईव्हीएमच्या मतांशी जोडण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव मोहम्मद आरिफ राजपूत यांनी केली होती.

नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या मतमोजणी प्रक्रियेत दखल देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. कमीत कमी 25 टक्के VVPAT पावत्यांना ईव्हीएमच्या मतांशी जोडण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव मोहम्मद आरिफ राजपूत यांनी केली होती. गुजरात हायकोर्टानंतर ही याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली. ''निवडणूक प्रक्रिया सध्या चालू आहे. निवडणूक आयोग नियमांनुसार ही प्रक्रिया पूर्ण करत आहे. कोर्ट निवडणूक आयोगाच्या कामात दखल देऊ शकत नाही'', असा निर्णय सुप्रीम कोर्टाने मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला. ''प्रत्येक मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर VVPAT च्या पावत्या ईव्हीएमशी जोडण्याचं स्वतः निवडणूक आयोगाने म्हटलं होतं. मात्र ही संख्या कमी आहे. एका मतदारसंघात शेकडो मतदान केंद्र असतात. या प्रक्रिया कमीत कमी 20 ते 25 टक्के मतदारसंघासाठी लागू करावी'', अशी मागणी याचिकाकर्त्याचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली. दरम्यान, निवडणूक आयोगाला आपल्या नियमांनुसार निवडणूक घेण्याचा अधिकार आहे, असं म्हणत कोर्टाने ही याचिका फेटाळली. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी निवडणूक आयोगाने एका मतदान केंद्रावर VVPAT ची पावती ईव्हीएमशी जोडणार असल्याचं म्हटलं होतं. यामध्ये चूक असल्याचं काहीही दिसत नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. ''निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, प्रत्येक उमेदवार निवडणूक प्रक्रियेविषयी तक्रार रिटर्निंग ऑफिसरला करु शकतो. रिटर्निंग ऑफिसरला वाटल्यास मतदान पुन्हा घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे अशा परिस्थितीत दोन दिवसांवर आलेल्या मतमोजणीत कोर्ट कोणतीही दखल देऊ शकत नाही'', असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. ''निवडणूक प्रक्रियेत सुधारणा आणणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. निवडणूक प्रक्रिया भविष्यात आणखी चांगली कशी करता येईल, याबाबत कोर्ट सुनावणी करु शकतं. याचिकाकर्त्यांना वाटल्यास त्यांनी नंतर या मुद्द्यावर स्वतंत्र याचिका दाखल करावी'', असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget