Jahangirpuri Demolition Drive : जहांगीरपुरीतील हिंसाचारानंतर सर्वोच्च न्यायालयाने एमसीडीच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला ब्रेक लावला आहे. न्यायालयाने तूर्तास स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणावर गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. यापूर्वी जमियत-उलेमा-ए-हिंदने देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईविरोधातील आपल्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. दुष्यंत दवे यांनी हे प्रकरण प्रथम सर्वोच्च न्यायालयात मांडले. बेकायदेशीर कारवाई केली जात असून नोटीसही देण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले. यानंतर, सीजेआय म्हणाले की, सध्याची स्थिती कायम ठेवली पाहिजे.असे ते म्हणाले होते. यानंतर CJI ने म्हटंले, यथास्थिती कायम ठेवली पाहिजे.


इक्बाल सिंग म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू


दुसरीकडे, महापालिकेने बेकायदा बांधकामांवर बुलडोझरच्या कारवाईवर बंदी घालण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर राजा इक्बाल सिंग यांनी सांगितले की, आपण या आदेशाचे पालन करू. माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असून त्यानुसार कारवाई करणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, बेकायदा बांधकाम पाडण्याचे काम आम्ही सध्या थांबवले आहे.


 






 


ओवेसींवर बुलडोझरचा हल्ला


एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी जहांगीरपुरीतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्याच्या निर्णयावर 'भाजपची गरीबांविरुद्धची युद्ध घोषणा' असे सांगितले आहे. तसेच या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "भाजपने गरिबांच्या विरोधात युद्ध घोषित केले आहे. भाजप अतिक्रमणाच्या नावावर यूपी आणि दिल्लीत घरे उद्ध्वस्त करणार आहे. यावर कोणतीच नोटीस नाही, कोर्टात जाण्याची संधी नाही. फक्त गरीब मुस्लिमांना जिवंत राहण्याची शिक्षा भोगावी लागते.


केजरीवालांनी आपली भूमिका स्पष्ट करावी - ओवेसी
ओवेसी म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांच्या सरकारच्या PWD या 'डिमोलिशन ड्राईव्ह'चा भाग आहे का? एवढ्या विश्वासघात आणि भ्याडपणासाठीच जहांगीरपुरीच्या जनतेने त्यांना मतदान केले का? त्याची वारंवार टाळाटाळ करून 'पोलीस आमच्या ताब्यात नाही' असे म्हणणे येथे चालणार नाही. आपल्या ट्विटच्या शेवटी असदुद्दीन ओवेसी यांनी लिहिले की, "निराशाजनक परिस्थिती."


संपूर्ण परिसरावर ड्रोनद्वारे लक्ष
याआधी जहांगीरपुरी येथील मशिदीला लागून असलेल्या त्याच रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले होते, ज्यावर हिंसाचार झाला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. यासोबतच संपूर्ण परिसरावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. घटनास्थळी पोहोचलेले विशेष सीपी कायदा व सुव्यवस्था दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, एमसीडीची जी काही अतिक्रमण हटाव मोहीम असेल, आम्ही त्यात मदत करू. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि त्यानुसार पुरेसा बळ पुरवणे ही आमची भूमिका आहे. आज या मोहिमेसाठी आम्ही पुरेशी व्यवस्था केली आहे. कोणत्याही अनुचित घटनेला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.


दोन समुदायांमध्ये हिंसा


शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे शोभा यात्रेदरम्यान दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला होता. यामध्ये दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत अल्पवयीन मुलासह 26 जणांना अटक केली आहे. चौकशीत अनेक महत्त्वाचे पुरावेही हाती लागले आहेत. यानंतर उत्तर दिल्ली महानगरपालिकेच्या वतीने जहांगीरपुरीतील बेकायदा बांधकाम हटवण्याची परवानगी मागण्यात आली होती.