WHO chief visit to Gujarat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी गुजरातमधील जामनगर येथे WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनचे उद्घाटन केले. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ टेड्रोस अधानोम गेब्रेयसस हे देखील उद्घाटन समारंभास उपस्थित होते. यावेळी त्यांनी गुजराती भाषेत जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी एकच टाळ्यांचा कडकडाट सुरू केला. असं काय म्हणाले WHO प्रमुख?


गुजराती भाषेत जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जामनगर येथे WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनचे उद्घाटन केले. WHO चे प्रमुख डॉ टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी गुजराती भाषेतून संबोधनाची सुरुवात केली. प्रथम त्यांनी हात जोडून नमस्कार केला आणि नंतर 'केम छो" असे विचारले. यानंतर लोकांनी जेव्हा याचे उत्तर दिले, तेव्हा त्यांनी मजमा असेही म्हटले. गेब्रेयसस म्हणाले की, डब्ल्यूएचओ-ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन हा योगायोग नाही. यादरम्यान डब्ल्यूएचओ प्रमुखांनी आपल्या गुजराती संवादाने सर्वांची मने जिंकली. त्यांचे गुजराती ऐकून पीएम मोदीही हसून टाळ्या वाजवू लागले.






 


'भारत सरकारचे आभार'


WHO महासंचालक म्हणाले, “आम्ही सुरू करत असलेले WHO-ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन पुराव्यावर आधारित पारंपारिक औषधांना बळकट करण्यासाठी तसेच विज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यास मदत करेल. नेतृत्वासाठी मी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारचा आभारी आहे. ते म्हणाले, "केंद्र स्थापन करण्यासाठी USD 250 दशलक्ष गुंतवणुकीसाठी आणि परिचालन खर्चासाठी 10 वर्षांच्या वचनबद्धतेबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. ज्या दिवसापासून मी पंतप्रधान मोदींशी बोललो, त्यांची वचनबद्धता आश्चर्यकारक होती आणि हे केंद्र चांगल्या हातात असेल हे माहीत होतं."


जगभरातील लोकांना होणार फायदा


WHO चे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस गुजरातच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. गेब्रेयसस म्हणाले की मी देखील बॉलीवूड चित्रपट पाहत मोठा झालो आहे. भारतात आल्यावर गेब्रेयसस यांनी सांगितले होते की, आयुष मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी केलेल्या हार्दिक स्वागताबद्दल मी आभारी आहे. आम्ही अशा गोष्टींवर काम करत आहोत ज्यामुळे पारंपारिक औषधांना आधुनिक आरोग्याशी जोडण्याचा पाया घातला जाईल आणि जगभरातील लोकांना फायदा होईल.