नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँकेने आपल्या सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेसोबतच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला औपचारिक स्वरूपात मंजूरी दिली आहे. याशिवाय शेअर्सच्या अदालाबदलीचे प्रमाणही निश्चित करण्यात आले आहे.


 

गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच या बँकांच्या शेअर्सच्या आदलाबदलीचे प्रमाणही निश्चित करण्यात आले.

 

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

 

स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅन्ड जयपूरचे 10 शेअरच्या बदल्यात स्टेट बँकेचे 28 शेअर मिळणार आहेत.

 

स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या 10 शेअरच्या बदल्यात स्टेट बँकेचे 22 शेअर मिळतील.

 

स्टेट बँक ऑफ त्रावणकोरच्या 10 शेअरच्या बदल्यात भारतीय स्टेट बँकेचे 22 शेअर मिळणार आहेत.

 

याशिवाय भारतीय महिला बँकेच्या 100 शेअरच्या तुलनेत महिला बँकेच्या 4 कोटी 42 लाख 31 हजार 510 शेअर देण्यात येतील.

 

इतर दोन सहकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबादचे शेअर्सची विक्री स्टॉक एक्सचेंजमध्ये होत नसल्याने, त्याच्या शेअरच्या अदला-बदलीचे प्रमाण सर्वजनिक करण्यात आले नाही.

 

केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 जून रोजी एसबीआयसोबत त्यांच्या पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विलिनीकरणाला तत्त्वत: मान्यता दिली होती. एसबीआयला 31 मार्च 2017चे अर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी ही विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या विलिनीकरणामुळे भारतीय स्टेट बँक देशातील सर्वात मोठी बँक बनेल.

 

31 मार्च 2016च्या उपलब्ध आकडेवारीनुसार, पाच सहयोगी बँकेमध्ये जवळपास 5 लाख कोटीहून अधिक रक्कम जमा आहे. तर या सर्व बँकांनी जवळपास 4 लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. या बँकांचा NP जवळपास 90 लाख कोटी रुपये आहे. तसेच या पाच बँकांमधून तब्बल 70 हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.

 

31 मार्च 2015 पर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2013 मध्ये सुरु झालेल्या महिला बँकेमध्ये 751 कोटी रुपयांची रोकड जमा आहे. तर या बँकेने जवळपास 350 कोटींचे कर्ज दिले आहे.

 

एसबीआयच्या मते, या विलिनीकरणाचा सर्वांनाच फायदा होईल. तसेच एसबीआयचे नेटवर्क वाढणार आहे. शिवाय या बँकांच्या शाखा आणि त्यातील कुशल कर्मचाऱ्यांमुळे बँकेच्या कामकाजात अधिक सुधारणा होईल. आजपर्यंत भारतीय बँकिंग क्षेत्रातील कोणत्याही बँकेचा मोजक्या 50 बँकेत समावेश नव्हता. मात्र, या विलीनीकरणाच्या प्रक्रियेमुळे जागतिक स्तरावर भारतीय बँकिंग क्षेत्राची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

 

जवळपास साडे 16 हजार शाखांमुळे स्टेट बँक देशातील मोठी बँक म्हणून गणली जाईल. मात्र, जगातील 50 बँकांच्या यादीत याचा समावेश होणार नाही. सध्या जागतिक बँकांच्या क्रमवारीत स्टेट बँकेचा 67 वा क्रमांक आहे.

 

केंद्र सरकारच्या मते देशात बँकाची संख्या कमी असावी, मात्र, जगातील ठराविक बँकांमध्ये भारतीय बँकेला स्थान मिळाले पाहिजे. यादृष्टीने ही विलीनीकरणाची प्रक्रियेला प्राथमिकता देण्यात येत आहे.