एक्स्प्लोर
Advertisement
एसबीआयच्या होम लोनवरील व्याज दरात कपात
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) होम लोनवरील व्याजदर 0.1 टक्के ते 0.25 टक्क्यांनी स्वस्त केले आहे. त्यामुळे होम लोनवरील व्याज दर आता 8.60 टक्क्यांवरुन 8.35 टक्के झाले आहे.
आताच्या घडीला इतर सर्व बँकांच्या तुलनेत एसबीआयचं होम लोन सर्वात स्वस्त झाले आहे. त्यामुळे एसबीआयच्या ग्राहकांच्या लोनवरील ईएमआय स्वस्त होईल आणि ग्राहकांची दर महिन्याला बचतही वाढेल.
एसबीआयची होम लोनवरील नवी कपात 9 मे 2017 पासून लागू होईल. होम लोनवरील व्याज दरातील कपातीमुळे अफोर्डेबल हाऊसिंगला प्रोत्साहन मिळेल आणि अधिकाधिक ग्राहकांचं एसबीआय होम लोनच्या माध्यमातून नव्या घराचं स्वप्नही पूर्ण होईल.
SBI होम लोनचे नवे व्याज दर :
- महिलांसाठी – 30 लाखांपर्यंतच्या होम लोनवर आता 8.35 टक्के व्याज दर
- पुरुषांसाठी – 33 लाखांपर्यंतच्या होम लोनवर आता 8.4 टक्के व्याज दर
- पुरुषांसाठी – 30 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या होम लोनवर आता 8.5 टक्के व्याज दर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement