एक्स्प्लोर

कर्नाटकात काँटे की टक्कर, सट्टा बाजाराचा अंदाज

कर्नाटकात काँटे की टक्कर होणार असून, कुणालाही बहुमत मिळणार नाही. मात्र, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, तर त्यामागोमाग दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असेल. जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर राहून किंगमेकरची भूमिका निभावेल, असा अंदाज सट्टा बाजारात वर्तवला जातो आहे.

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक अगदी दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. कर्नाटकची सत्ता कोण काबीज करणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. विविध सर्वेक्षणांची आकडेवारीही समोर आली असून, सर्वच सर्वेक्षणांमध्ये कल वेगवेगळा दिसत आहे. अशातच सट्टा बाजारानेही कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज वर्तवला आहे. सट्टा बाजाराचा अंदाज काय? कर्नाटकात काँटे की टक्कर होणार असून, कुणालाही बहुमत मिळणार नाही. मात्र, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, तर त्यामागोमाग दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असेल. जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर राहून किंगमेकरची भूमिका निभावेल, असा अंदाज सट्टा बाजारात वर्तवला जातो आहे. कुणाला किती जागा मिळतील? सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, “कर्नाटकात कुठलाच पक्ष स्वत:च्या हिंमतीवर सरकार बनवू शकत नाही. भाजपला 92-94 जागांवर विजय मिळेल, काँग्रेसला 89-91 जागांवर विजय मिळेल, तर जेडीएसला 32-34 जागांवर विजय मिळेल.” सट्टा बाजाराची अंदाजित आकडेवारी पाहता कुणीही एकहाती सत्ता मिळवू शकत नाही. कारण कर्नाटकच्या 224 जागांच्या विधानसभेत 113 जागा बहुमतासाठी आवश्यक ठरतात. सट्टा कसा लावण्यात आला आहे? एका बुकीच्या माहितीनुसार, सट्टा बाजाराचे हे आकडे सेशनचे आकडे आहेत. म्हणजे जर कुणी व्यक्ती भाजपच्या 92 जागा जिंकण्यावर एक लाख रुपये लावत असेल आणि भाजप 92 जागा किंवा त्याहून कमी जागा जिंकली, तर पैसे लावणाऱ्याला एक लाखाच्या जागी दोन लाख रुपये मिळतील. मात्र जर भाजपला 93 किंवा त्याहून जास्त जागा जिंकली, तर ती व्यक्ती पराभूत होईल. तसेच, जर कुणी व्यक्ती भाजपच्या 94 जागा जिंकण्यावर एक लाख रुपये लावत असेल आणि भाजप 94 किंवा त्याहून अधिक जागा जिंकली, तर पैसे लावणाऱ्या एका लाखाचे दोन लाख मिळतील. मात्र भाजप पराभूत झाल्यास ती व्यक्ती पराभूत होईल. असाच काँग्रेसवर सट्टा लावण्यात येत आहे. कुठल्या पक्षाला किती भाव? बुकींच्या आकडेवारीनुसार, भाजपच्या 100 जागा जिंकण्याचा भाव 2.50 रुपये म्हणजे एक रुपया लावल्यास 2.50 रुपये मिळतील. मिशन-113 पार करण्याचा भाव 5.2 रुपये असेल. त्याचवेळी, काँग्रेसच्या 100 जागा जिंकण्याचा भाव 3.4 रुपये आणि बहुमताचा आकडा पार करण्यावर 6.1 रुपयाचा भाव आहे. व्हीआयपी जागांवरही सट्टा पक्षांच्या विजय-पराजयासोबतच व्हीआयपी जागांवर सुद्धा सट्टा लावला जात आहे. ज्या जागांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चामुंडेश्वरीच्या जागेवर ‘काँटे की टक्कर’ तर बदामीच्या जागेवर सिद्धरामय्या यांचा विजय निश्चित मानला जात आहे. चामुंडेश्वरीत सिद्धरामय्या यांच्या विजयाचा भाव 2.4 रुपये आहे, तर बदामीतील विजयाचा भाव 70 पैसे आहे. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी एस येडीयुरप्पा यांच्या शिकारीपुराच्या जागेवर विजयाचा भाव 50 पैसे आहे, तर कुमारस्वामी यांच्या रामनगराच्या विजयाचा भाव एक रुपया आहे. कर्नाटकात एकूण किती सट्टा? सट्टा बाजारानुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत 200 कोटी रुपयांहून अधिक सट्टा लावण्यात आला आहे. मात्र मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल, तसे हे भाव वाढत जातील. 12 मे रोजी मतदान आणि 15 मे रोजी निकाल 12 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असून, 15 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. काँग्रेससाठी सत्ता राखण्याचे, तर भाजपसाठी सत्ता खेचून आणण्याचे आव्हान आहे. त्यात जेडीएसचं आव्हानही तगडं आहे. त्यामुळे कर्नाटकात कोण सत्तेच्या खुर्चीवर बसेल, याची उत्सुकता कर्नाटकसह देशभरातील जनतेला लागली आहे.
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता? अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टकडून ना पावती, ना कुठली माहिती; संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले...
शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता? अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टकडून ना पावती, ना कुठली माहिती; संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले...
राम मंदिरातील कोट्यवधींच्या देणगीवरच डल्ला मारला, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अखेर एफआयआर दाखल, पण चंपत राय, डॉ. अनिल मिश्रांची नावेच नाहीत! संजय सिंह म्हणाले, हेच सर्वात मोठे चाेर
राम मंदिरातील कोट्यवधींच्या देणगीवरच डल्ला मारला, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अखेर एफआयआर दाखल, पण चंपत राय, डॉ. अनिल मिश्रांची नावेच नाहीत! संजय सिंह म्हणाले, हेच सर्वात मोठे चाेर
Modi Government Cabinet Expansion: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार, धर्मेंद्र प्रधानांना डच्चू मिळणार? श्रीकांत शिंदेंना मोठी संधी मिळण्याची शक्यता
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार, धर्मेंद्र प्रधानांना डच्चू मिळणार? श्रीकांत शिंदेंना मोठी संधी मिळण्याची शक्यता
ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पावसाळी अधिवेशनापूर्वी 'ऑपरेशन टायगर'वर फैसला होणार? 
ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पावसाळी अधिवेशनापूर्वी 'ऑपरेशन टायगर'वर फैसला होणार? 

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agarwal Death: 'मी केतनला माझ्या अफेअरबद्दल सांगितलेलं...'; सियाचा दावा अन् मोबाईलमधील चॅट्स, फोटोने उघड केलं 'ते' खोटं बोलणं, हादरवणाऱ्या गोष्टी समोर
'मी केतनला माझ्या अफेअरबद्दल सांगितलेलं...'; सियाचा दावा अन् मोबाईलमधील चॅट्स, फोटोने उघड केलं 'ते' खोटं बोलणं, हादरवणाऱ्या गोष्टी समोर
लोकप्रतिनिधी दुसरा आहे म्हणून जनतेला ब्लॉक करायची लोकशाहीसाठी अत्यंत घातक पद्धत सत्ताधाऱ्यांनी आणली; आमदार कैलास पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'आमदार-खासदार दुसऱ्या पक्षाचा असला तरी...'
लोकप्रतिनिधी दुसरा आहे म्हणून जनतेला ब्लॉक करायची लोकशाहीसाठी अत्यंत घातक पद्धत सत्ताधाऱ्यांनी आणली; आमदार कैलास पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'आमदार-खासदार दुसऱ्या पक्षाचा असला तरी...'
Prakash Abitkar: शिवसेनेकडे आमदार खासदारांचा ओढा वाढलाय, येणाऱ्या काळात अनेकजण शिवसेनेमध्ये येतील; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचं सूचक वक्तव्य
शिवसेनेकडे आमदार खासदारांचा ओढा वाढलाय, येणाऱ्या काळात अनेकजण शिवसेनेमध्ये येतील; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचं सूचक वक्तव्य
Satej Patil on Hasan Mushrif: 'ती' क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवतो, एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास होत नाही; सतेज पाटलांचा खोचक टोला
'ती' क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवतो, एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास होत नाही; सतेज पाटलांचा खोचक टोला
Ketan Agrawal and Siya Goyal: केतनला टक्कल होतं, केसांचा विग लावायचा; सिया गोयलने पोलिसांना सांगितलं लग्न न करण्याचं खरं कारण
पोलिसांच्या चौकशीत सिया गोयल पोपटासारखी बोलायला लागली, केतनसोबत लग्नाला नकार देण्याचं खरं कारणं सांगितलं
राम मंदिरातील कोट्यवधींच्या देणगीवरच डल्ला मारला, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अखेर एफआयआर दाखल, पण चंपत राय, डॉ. अनिल मिश्रांची नावेच नाहीत! संजय सिंह म्हणाले, हेच सर्वात मोठे चाेर
राम मंदिरातील कोट्यवधींच्या देणगीवरच डल्ला मारला, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अखेर एफआयआर दाखल, पण चंपत राय, डॉ. अनिल मिश्रांची नावेच नाहीत! संजय सिंह म्हणाले, हेच सर्वात मोठे चाेर
Maharashtra Epstein Files Marathi Movie: 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक, रुपाची चाकणकरांच्या भूमिकेतील दिपाली सय्यद अन् पाठमोरा अशोक खरात, अभिनेत्याच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम
'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक, रुपाची चाकणकरांच्या भूमिकेतील दिपाली सय्यद अन् पाठमोरा अशोक खरात, अभिनेत्याच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम

Embed widget