एक्स्प्लोर

आसामच्या महिला आयपीएस अधिकाऱ्याची देशभर जोरदार चर्चा

आसामची आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजुक्ता पारशरने आपल्या 15 महिन्यांच्या कारकीर्दीत 16 दहशतवाद्यांचा खात्मा, तर 64 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तिच्या या धाडसी कामगिरीची सध्या देशभर चर्चा सुरु आहे.

दिसपूर : आसामच्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याची सध्या संपूर्ण देशात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, आसामची आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजुक्ता पारशरने आपल्या 15 महिन्यांच्या कारकीर्दीत 16 दहशतवाद्यांचा खात्मा, तर 64 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या या धाडसी कामगिरीची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. आसाममध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, दिल्लीतल्या इंद्रप्रस्थ कॉलेजमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. इथून त्यांनी पॉलिटिकल सायन्स शाखेची पदवी मिळवली. यानंतर त्यांनी दिल्लीतल्याच जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून 'अमेरिकेचं परराष्ट्र धोरण' या विषयात पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. 2006 मध्ये आयपीएस परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन 85 वी रँक मिळवली. आयपीएस अधिकारी म्हणून पोलीस सेवेत रुजू होताना गुन्हेगारांचा खात्मा करण्याची शपथच त्यांनी घेतली. त्यांची सर्वात पहिली पोस्टिंग 2008 मध्ये आसामच्याच माकुममध्ये सहाय्यक कमान्डेंट ऑफिसरच्या रुपात झाली. यावेळी संजुक्तांच्या धाडसी कामगिरीमुळे अधिकारी वर्गात त्यांच्या नावाची मोठी चर्चा सुरु झाली. त्यामुळेच काही दिवसांतच त्यांना उदालिगिरीमधील बोडो आणि बांगलादेशीयांमधील हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आपली पहिलीच मोहीम फत्ते करत, त्यांनी 15 महिन्यात 16 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर 64 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. सध्या त्यांच्या याच दबंगगिरीमुळे केवळ आसाममध्येच नव्हे, तर संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. पण दुसरीकडे आसाममध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा संयुक्तांना प्रचंड तिटकारा आहे. त्याविरोधात लढण्यासही त्या सदैव तयार असते. संजुक्ता यांना चार वर्षीय मुलगा देखील आहे. पण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना, त्यांनी कर्तव्यात कधीही कसूर सोडली नाही. संजुक्ता नुकत्याच एका मोहिमेत दहशतवाद्यांशी लढण्यासाठी स्वत: हातात एके 47 घेऊन मैदानात उतरल्या होत्या. गेल्या काही वर्षात त्यांनी बोडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेत स्वत:ला झोकून दिलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET Exam Paper Leak: नीट परीक्षेबाबत सर्वात मोठी अपडेट, दगाफटका टाळण्यासाठी परीक्षेची जबाबदारी इंडियन आर्मीवर? केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
नीट परीक्षेबाबत सर्वात मोठी अपडेट, दगाफटका टाळण्यासाठी परीक्षेची जबाबदारी इंडियन आर्मीवर? केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
BJP: मोठी बातमी: भाजपने भाकरी फिरवली! दिल्ली, हरियाणासह 4 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले; केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी
भाजपने भाकरी फिरवली! दिल्ली, हरियाणासह 4 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले; केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी
Siddaramaiah : अखेर सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार, नव्या सरकारची स्थापना कधी?
सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार
CM Thalapathy Vijay Meet PM Modi: हातात फुलांचा गुच्छ, चेहऱ्यावर स्मितहास्य; तामिळनाडूचे डॅशिंग मुख्यमंत्री थलपती विजय पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी, 25 मिनिटांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ
हातात फुलांचा गुच्छ, चेहऱ्यावर स्मितहास्य; तामिळनाडूचे डॅशिंग मुख्यमंत्री थलपती विजय पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी, 25 मिनिटांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Ambulance Fire : गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करताच ॲम्बुलन्सला भीषण आग; सोलापुरात मोठा अनर्थ टळला
गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करताच ॲम्बुलन्सला भीषण आग; सोलापुरात मोठा अनर्थ टळला
Instagram Influencer Death: आंतरजातीय प्रेमविवाह, पुण्यात संसार थाटला, मग गावी जाऊन हॉटेल उभारलं, रीलस्टार रोहिणीने आयुष्य का संपवलं?
आंतरजातीय प्रेमविवाह, पुण्यात संसार थाटला, मग गावी जाऊन हॉटेल उभारलं, रीलस्टार रोहिणीने आयुष्य का संपवलं?
Buldhana : जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं; बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं
बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं; जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं
Beed Crime News: बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालनं आता राजस्थान रॉयल्स सोडून दिलं पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, नव्या टीमचं नाव सुचवलं
यशस्वी जयस्वालनं आता टीम बदलली पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, कारण सांगितलं...
US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
Pandharpur VIP Darshan: खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
Embed widget