एक्स्प्लोर

सपा स्वबळावर लढण्यासाठी सक्षम, मुलायम सिंहांचा महायुतीला नकार

लखनऊ : उत्तर प्रदेशचं राजकारण संपूर्ण देशासाठी चर्चेचा विषय आहे. कारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मिशन 2019 रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येण्याचे चिन्ह आहेत. तसे संकेतही मिळाले आहेत. मात्र समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांनी कोणत्याही प्रकारची महायुती करण्याची शक्यता फेटाळली आहे. समाजवादी पार्टी कुणाशीही महायुती करणार नाही. आमचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी सक्षम आहे, असं मुलायम सिंह यादव यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे कालच सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी येत्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांसोबत एकत्र येण्याचे संकेत दिले होते. मायावतींचा युतीसाठी प्रस्ताव बसपा अध्यक्ष मायावती यांनी दोन दिवसांपूर्वीच युतीचे स्पष्ट संकेत दिले होते. देशातील लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि ईव्हीएमच्या घोळाविरोधात केल्या जात असणाऱ्या आंदोलनात भाजपचे विरोधी पक्ष आमच्यासोबत आल्यास त्यांच्याशी हातमिळवणी करण्यासा आम्हाला काही हरकत नसेल, असं मायावती म्हणाल्या होत्या. मायावतींनी भाजपला रोखण्यासाठी इतर विरोधीपक्षांना एकत्र येण्याचे संकेत दिले होते. तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी अखिलेश यादव यांनीही भाजपला रोखण्यासाठी मायावतींसोबत जाण्यास हरकत नसेल, असं म्हटलं होतं. विधानसभा निवडणुकीत सपा, काँग्रेस आणि बसपा मिळून 73 जागा नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला 403 पैकी 325 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस-सपा आणि बसपा या तिन्ही पक्षांना मिळून 73 जागा मिळाल्या आहेत. मात्र मताधिक्याच्या बाबतीत सपा आणि बसपाने बाजी मारली आहे. दोन्हीही पक्षांना प्रत्येकी 22 टक्के मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसला 6 टक्के मताधिक्य मिळालं आहे. देशातील सर्वात मोठं राज्य म्हणून ओळख असणाऱ्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने 80 पैकी 73 जागांवर विजय मिळाला होता. तर बसपा आणि सपाला केवळ प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Crime News: पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर
पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
Embed widget