नवी दिल्ली : सुप्रीम कार्टाचे न्यायमूर्ती म्हटलं की त्यांनी न्यायालयात दिलेला आदेश जवळपास अंतिम मानला जातो. मात्र सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तीचे वेतन तितकं जास्त नाही, जितका तुम्ही विचार कराल. कारण सुप्रीम कोर्टीचे विद्यमान न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ वकील, निवृत्त न्यायमूर्ती यांच्या वेतनाची किंवा कमाईची तुलना केली तर त्यात कित्येक पटीने तफावत आढळते. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तीं यांच्या कामाचा पसारा पाहिला तर एका महिन्याच्या पगाराच्या तुलनेत ज्येष्ठ वकील एका केससाठी तेवढी फी आकारतात.
मनी कंट्रोलच्या बातमीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना दरमहा सुमारे अडीच लाख रुपये वेतन मिळते, जे प्रतिदिन सुमारे 8333 रुपये आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना दररोज सरासरी 40 प्रकरणांमध्ये वकिलांचे युक्तिवाद ऐकणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे वेतन प्रति प्रकरण 208 रुपयांवर जाते. या प्रकरणांमध्ये साधे अपील, जनहित याचिका किंवा कायद्याच्या गुंतागुंतीच्या बाबींचा वादविवाद असं सर्वकाही न्यायाधीशांना प्रामाणिकपणे ऐकावे लागते.
याउलट, नवीन वरिष्ठ वकिलांना खटल्याचा युक्तिवाद करण्यासाठी 1 ते 5 लाख रुपये दिले जातात. अनुभवी ज्येष्ठ वकील यासाठी प्रति सुनावणी 10 ते 20 लाखांपर्यंत शुल्क आकारतात. यामध्ये कपिल सिब्बल, मुकुल रोहतगी आणि हरीश साळवे यांसारख्या ज्येष्ठ वकीलांचा समावेश आहे.
यानुसार सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना एका खटल्याच्या सुनावणी आणि निकाल देताना प्रति केस 208 रुपये प्रतिदिन मिळतात. तर ज्येष्ठ वकिलांना दररोज प्रत्येक केससाठी लाखो रुपये मिळतात. मात्र हे वकील एखाद्या खटल्याच्या निर्णयाची हमी देऊ शकत नाहीत.
वरिष्ठ वकील एका दिवसात 40 खटल्यांचा युक्तिवाद करत नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दररोज इतक्या खटल्यांच्या सुनावणीसाठी दुसर्या दिवसाची तयारी करावी लागते. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अॅट्रिब्युटर म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या देशातील करार, कराराशी संबंधित वाद-विवादांबाबत आपला सल्ला देण्याचे काम करु शकतात.
अॅट्रिब्युटरच्या रूपात दोन तासांच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांना 2-5 लाख रुपये मिळतात. असे सेवानिवृत्त न्यायाधीश देखील आहेत जे एका दिवसात तीन सुनावणी करतात आणि यशस्वी ज्येष्ठ वकिलाच्या समान मिळकत मिळवतात. मात्र याच सेवा निवृत्त न्यायधीशांची कमाई सेवानिवृत्तीनंतर अधिक असते. मात्र निवृत्तीनंतर ते जे काम करतात, त्यात त्यांचा सर्वोच्च न्यायालयातील अनुभव महत्त्वाचा असतो, हे ही विसरुन चालणार नाही.