एक्स्प्लोर

'नोटाबंदीच्या निर्णयानं आर्थिक यादवी', सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका

मुंबई: 'मोदी यांच्या साफसफाई मोहिमेचे आम्ही स्वागत करतो, पण त्यांनी जो मार्ग त्यासाठी स्वीकारला आहे तो भयंकर अनागोंदीचा आहे. मोदी यांच्या निर्णयानंतर देशात आर्थिक अराजकाचा स्फोट झाला आहे.' अशी जोरदार टीका  शिवसेननं आपलं मुखपत्र सामनातून केली आहे. 'देशातला काळा पैसा, बेहिशेबी संपत्ती खतम व्हायलाच पाहिजे! काळा पैसा हा आमच्या अर्थव्यवस्थेवरील कलंक आहे. पण मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक यादवी आली आहे', असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून या निर्णयावर सडकून टीका करण्यात आली आहे. एक नजर सामनाच्या अग्रलेखावर: १२५ कोटी जनता गारद * काळा पैसा हा आमच्या अर्थव्यवस्थेवरील कलंक आहे. मोदी यांच्या साफसफाई मोहिमेचे आम्ही स्वागत करतोय, पण त्यांनी जो मार्ग त्यासाठी स्वीकारला आहे तो भयंकर अनागोंदीचा आहे. मोदी यांच्या निर्णयानंतर देशात आर्थिक अराजकाचा स्फोट झाला आहे. या स्फोटात बळी गेलेल्यांची संख्या सवाशे कोटी आहे. हे सर्व लोक भ्रष्टाचारी व काळा पैसावाले आहेत काय? देशात सध्या आर्थिक यादवीच निर्माण झाली आहे आणि देशातील १२५ कोटी जनता यात गारद होणार असे भयंकर चित्र दिसत आहे. आज पाचशे-हजारच्या नोटा तुम्ही अचानक रद्द केल्याने जी सवाशे कोटी जनता उन्हात अन्नपाण्याशिवाय तडफडते आहे ती तुमच्या पाठीशी राहणार आहे काय? * पंतप्रधान मोदी यांनी जपानच्या भूमीवरून जाहीर केले आहे की, ३० डिसेंबरनंतर ते आणखी एक जोरदार धमाका करणार आहेत. पाचशे-हजारच्या नोटा अचानक रद्द करून त्यांनी हिंदुस्थानच्या सवाशे कोटी जनतेवर आर्थिक अराजकाचा बॉम्ब आधीच टाकला आहे. या बॉम्बहल्ल्यात विव्हळणार्यान जनतेला सॅल्यूट करीत त्यांनी सांगितले की, ३० डिसेंबरनंतर आणखी एक धमाका करू! बहुधा पंतप्रधान पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकून दहशतवादाचा कारखाना दाऊदसह बेचिराख करण्याच्या विचारात असावेत. नाही तरी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आधीच सांगून टाकले आहे की, पाकिस्तानवर आम्ही अणुबॉम्ब टाकू. बहुधा हाच धमाका ३० डिसेंबरनंतर होईल. * अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार व्हायला आता फक्त २०-२५ दिवसांचा अवकाश आहे असे देशातील जनतेने समजायला हरकत नाही. ज्याप्रमाणे एका रात्रीत पाचशे-हजारच्या नोटा रद्द करण्याचे सिक्रेट मिशन मोदी यांनी तडीस नेले त्याचप्रमाणे ३० डिसेंबरनंतर संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू केल्याची घोषणा होईल. कश्मीरातील ३७० कलम हटवून ‘एक राष्ट्र, एक निशाण’चे स्वप्न साकार होईल. ३० डिसेंबरच्या मध्यरात्री अयोध्येत राममंदिर उभारणीच्या घोषणेचा धमाकाही होऊ शकतो. देशवासीयांनी ३० डिसेंबरनंतरच्या या धमाक्याची वाट पाहायला हवी. * पाचशे-हजारच्या नोटा एका क्षणात रद्द केल्याने जनता त्यांना आशीर्वाद देत आहे. मोदीजी, जनतेचे आशीर्वाद इतके स्वस्त आहेत काय? दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाची परतफेड जनतेला असे रस्त्यावर आणून केली काय? हा सरळ सरळ विश्वासघात आहे. मूठभर उद्योगपतींकडील काळे धन बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने सवाशे कोटी जनतेला रस्त्यावर आणले. अन्नपाण्याशिवाय उन्हात तडफडायला व मरायला लावले. काळा पैसा संपविण्यासाठी केलेला हा प्रयोग अघोरी आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर आहे. * देशातला काळा पैसा सवाशे कोटी मध्यमवर्गीयांकडे नसून देशाच्या आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात आहेत अशा १२५ घराण्यांकडे व राजकारण्यांकडे आहे. यापैकी किती लोक हजार-पाचशेच्या नोटांची बंडले घेऊन रांगेत उभे आहेत? त्यांचा पैसा परदेशी बँकांत सुरक्षित आहे व मोदी यांचा निर्णय होण्याआधीच या पैशाला परदेशाचे पाय फुटले असतील तर या लोकांवर काय कारवाई झाली? २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जो प्रचंड काळा पैसा फिरवला आणि जिरवला गेला त्याचा हिशेबही आता द्यावाच लागेल. पंतप्रधान मोदी देशात कमी आणि परदेशातच जास्त फिरतात अशी टीका त्यांचे विरोधक करतात. आताही मोदी जपानलाच होते. पंतप्रधान परदेशात सतत फिरतात ते जनतेच्या कष्टाच्या पैशांवर आणि त्यासाठी त्यांना रांगेत उभे राहून नोटा बदलाव्या लागलेल्या नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे. * लोकांना स्वत:च्या हक्काचे पैसे बँकेतून काढण्यासाठी चार-चार दिवस झगडावे लागत आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर सामान्य जनतेच्या सहनशक्तीचा कडेलोट होईल. देशातील वातावरण असे संवेदनशील झाले आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात की, आणखी दोन-तीन आठवडे परिस्थिती पूर्ववत होण्यास लागतील. त्यांनी असेही सांगितले की, घाबरू नका, नव्या नोटा भरपूर आहेत. मात्र हे झूठ आहे. फक्त दोन हजारांसाठी लोकांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय. खून, मारामार्याग, चोर्यां चे प्रमाण वाढले आहे व यालाच यादवी म्हणतात. देशात सध्या आर्थिक यादवीच निर्माण झाली आहे आणि देशातील १२५ कोटी जनता यात गारद होणार असे भयंकर चित्र दिसत आहे. मूठभर लोकांच्या हातात आजही देशाची आर्थिक सत्ता कायम आहे. त्यांच्या मुठीत गुदमरलेला देश कधी मुक्त होणार? उद्याच्या निवडणुका त्याच मूठभर लोकांच्या पैशांवर पुन्हा लढवल्या जातील व सत्ता मिळवली जाईल. त्यांना आजही पूर्ण संरक्षण रोकड्यात आहे, पण गरीब जनता, मजूर, शेतकरी हवालदिल होऊन रस्त्यांवर आहे. * पंतप्रधानांनी त्यांचा आक्रोश समजून घ्यावा. भ्रष्टाचार व काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काळा पैसा हा कॅन्सर आहे. त्याने देश पोखरला जात आहे हे खरेच, पण आज पाचशे-हजारच्या नोटा तुम्ही अचानक रद्द केल्याने जी सवाशे कोटी जनता उन्हात अन्नपाण्याशिवाय तडफडते आहे ती तुमच्या पाठीशी राहणार आहे काय? संबंधित बातम्या: सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ 500-1000च्या जुन्या नोटांचं आरबीआय करणार तरी काय? बँकेत पैसे जमा करताच थेट आयकर विभागाला माहिती पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट, सेकंड एसी वेटिंग तिकिटांवर बंदी कर्नाटकच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटल्यामागचं व्हायरल सत्य लाचखोर अधिकाऱ्याचेही चोचले, शंभरच्याच नोटा देण्याची तंबी एक हजाराची नवी नोट लवकरच येणार!, अर्थ मंत्रालयाची माहिती नोटा बदलण्यासाठी 5 सोप्या टिप्स बँकेकडून 100 ऐवजी, 10, 20 किंवा चिल्लरही हातात येऊ शकते! बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जुन्या नोटा बदलून मिळणार सर्व बँका गुरुवारी एक तास आधी सुरु, शनिवार-रविवारीही सुट्टी नाही सर्व रुग्णालयांनी 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारणं बंधनकारक मुंबईत सुट्ट्या पैशांसाठी नागरिकांची दलालांकडून लूट मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुंबई मेट्रो प्रशासनाची मुजोरी कायम नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार 500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार? 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार? 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द

महत्त्वाच्या बातम्या

हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
Rahul Gandhi: काँग्रेसचं सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन...जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget