एक्स्प्लोर

गोव्यात जीवरक्षकांचा संप महागात, दीड महिन्यात 14 पर्यटकांचा बुडून मृत्यू

गोव्यात जीवरक्षकांच्या संपामुळे मागील काही दिवसांत सुमारे 14 पर्यटकांचा बुडून मृत्यु झाला असुन, मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यानी ताबडतोब यात हस्तक्षेप करुन जीवरक्षकांच्या संपावर तोडगा काढावा,अशी मागणी कामत यांनी केली आहे.

गोवा: जीवरक्षकांच्या संपामुळे मागील दीड महिन्यात गोव्यात सुमारे 14 पर्यटकांचा बुडून मृत्यु झाला आहे. मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यानी ताबडतोब यात हस्तक्षेप करुन जीवरक्षकांना सरकारी सेवेत सामावून घेत संपावर तोडगा काढावा अन्यथा गोवा हे बुडून मरण्याचे ठिकाण बनेल, अशी टिका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.हरमल किनाऱ्यावर आज एका रशियन पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कामत यांनी ही टिका ट्वीट करून केली आहे. गोव्यात जीवरक्षकांच्या संपामुळे मागील काही दिवसांत  सुमारे 14 पर्यटकांचा बुडून मृत्यु झाला असुन, मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यानी ताबडतोब यात हस्तक्षेप करुन जीवरक्षकांच्या संपावर तोडगा काढावा,अशी मागणी कामत यांनी केली आहे .हरमल किनाऱ्यावर आज सायंकाळी 64 वर्षीय रशियन पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला.सकाळच्या सत्रात जीवरक्षकांनी कर्नाटक मधील दोन पर्यटकांना हरमल किनाऱ्यावरुन बुडताना वाचवण्यात यश मिळवले. जीवरक्षकांचा संप सुरु झाल्यापासून 14 पर्यटक बुडून मृत्यू झाला आहे. सरकारने या प्रश्नावर संवेदनशीलता दाखवणे महत्वाचे आहे. जीवरक्षकाना सरकारी सेवेत सामावुन घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करणे गरजेचे आहे,असे मत कामत यांनी व्यक्त केले आहे. सरकारने त्वरित यात हस्तक्षेप न केल्यास संपूर्ण पर्यटन व्यवसायच बुडण्याची भीती व्यक्त करून कामत म्हणाले, अशा घटना वाढू लागल्यास गोवा हे जलसमाधी स्थळ  बदनाम होईल हे मुख्यमंत्र्यानी लक्षात ठेवावे. आपला जीव धोक्यात घालुन, दुसऱ्यांचा जीव वाचवण्याची सेवा बजावणाऱ्या गोमंतकीय जीवरक्षकांना सर्व मदत व सहकार्य देणे सरकारचे कर्तव्य  आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे,असेही कामत म्हणाले. गोव्यातील पर्यटन व्यवसाय सध्या कठिण परिस्थीतीतुन जात आहे. रद्द झालेली चार्टर विमाने, शॅक वाटपात झालेला विलंब तसेच देशात आलेले आर्थिक मंदीचे सावट यामुळे पर्यटन उद्योगावर परिणाम झाला आहे. सरकारला पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी त्वरीत उपाय काढणे गरजेचे आहे,याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यानी त्वरित संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व गोमंतकीय जीवरक्षकाना सरकारी सेवेत घेण्यासाठी पाऊले उचलावीत,अशी मागणी कामत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk : ‘धिक्कार आहे अशा देशाचा जिथे असे ...’; उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले, ट्रोलर्सला सुनावलं!
‘धिक्कार आहे अशा देशाचा जिथे असे ...’ उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले, ट्रोलर्सला सुनावलं!
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
Abhijeet Dipke :  NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Embed widget