Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं जगाची चिंता वाढली आहे. या युद्धावरुन जगभरातून अनेक देश रशियावर टीका करत आहेत. यात युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी रशियावर गंभीर आरोप केले आहेत. इगोर पोलिखा यांनी रशियाच्या लष्करी मोहिमेची तुलना मुघलांनी राजपूतांच्या विरोधात केलेल्या नरसंहाराशी केली आहे. युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा म्हणाले की, रशियाचा हल्ला हा नरसंहार आहे आणि मुघलांनी राजपूतांसोबत जे केले होते तसेच आहे. 






डॉ. इगोर पोलिखा यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना खारकीव्ह येथील हल्ल्यात मृत झालेल्या नवीनचा उल्लेख केला. त्यांनी नवीनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की, नवीनच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. पूर्वी लष्करी ठिकाणांवर हल्ले केले जात होते. पण आता हे हल्ले नागरी भागातही केले जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी रशियावर केला.


इगोर पोलिखा यांनी म्हटलं आहे की, रशियाचा युक्रेनवरचा हल्ला म्हणजे भारताच्या इतिहासात मुघलांनी राजपूतांच्या केलेल्या नरसंहारासारखाच आहे. पुतीन यांना युक्रेनवर हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर करा, असे पंतप्रधान मोदींसह जगातील सर्व प्रभावशाली नेत्यांना आमचे आवाहन आहे, असं पोलिखा यांनी म्हटलं आहे. 


MEA अधिकार्‍यांशी झालेल्या भेटीबाबत पोलिखा यांनी सांगितलं की, भारताकडून युक्रेनला पुरविल्या जाणाऱ्या मदतीबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत. 



महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha