Russia Ukraine War : कॅनडाने रशियातील तेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी रशियन तेल आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. त्यानुसार कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी रशियन तेल आयातीवर बंदी घातली आहे. कॅनडाने घेतलेला हा निर्णय त्या धोरणाचा एक भाग आहे ज्या अंतर्गत युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल रशियावर विविध निर्बंध लादले जात आहेत. सर्व पाश्चिमात्य आणि युरोपीय देश हे करत आहेत.


युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हे देखील रशियावर निर्बंध लादण्यासाठी इतर देशांना सतत आवाहन करत आहेत. एएफपीच्या मते, 'झेलेन्स्की यांनी सर्व जागतिक विमानतळ आणि बंदरांवर रशियावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला आहे.' याशिवाय रशियन क्षेपणास्त्रे, विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी हवाई क्षेत्रावर बंदी घालण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, खार्किव बॉम्बस्फोटानंतर रशियन क्षेपणास्त्रे, विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी हवाई क्षेत्रावर बंदीचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले आहेत. झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, रशियाने पाच दिवसांत 56 हवाई हल्ले केले असून आणि 113 क्रूझ क्षेपणास्त्रे डागली आहेत.


युक्रेनने दुसऱ्या महायुद्धानंतर रशियन आक्रमणाचे वर्णन केले आहे. UNSC मध्ये युक्रेनने सांगितले की, "दुसऱ्या महायुद्धानंतरचे हे सर्वात भयंकर आणि मोठ्या प्रमाणावर झालेले आक्रमण आहे. रशिया निरपराध लोक, बालवाडी, अनाथाश्रम, रुग्णालये, मोबाइल वैद्यकीय मदत ब्रिगेड आणि रुग्णवाहिकांवर गोळीबार करत आहे. त्यामुळे नागरिकांची हत्या होत आहे.' 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha