ITA Awards 2022 : इंडियन टेलिव्हिजन अकादमी (ITA) पुरस्कारांमध्ये पुन्हा एकदा एबीपी न्यूजचा डंका वाजला आहे. सर्वात अचूक बातम्या देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या एबीपी न्यूजला पुन्हा एकदा सन्मानित करण्यात आलं आहे. एबीपी न्यूजच्या अँकर रुबिका लियाक  (Rubika Liyaquat) यांना आयटीए पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चॅट शो  (Best Chat Show) श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय एबीपी न्यूजच्या 'घंटा बजाओ' शोलाही सन्मान मिळाला आहे. यासोबतच सर्वोत्कृष्ट हिंदी वृत्तवाहिनीचा पुरस्कारही एबीपी न्यूजला  (Best Hindi News Channel)  मिळाला आहे.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुलाखत घेतल्याबद्दल रुबिका लियाकतल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या आयटीए (ITA) पुरस्कारांमध्ये रुबिका लियाकत यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर एबीपी न्यूजच्या घंटा बजाओ शोला बेस्ट न्यूज करंट अफेयर्स शोचा पुरस्कार (Best News Current Affair Show ) मिळाला आहे. अँकर अखिलेश आनंद यांना हा पुरस्कार मिळाला आहे.






 


ITA Awards  2022 : आधीही मिळाला आहे पुरस्कार


या वर्षीच्या जुलै महिन्यात एबीपी नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडे (Avinash Pandey)  यांना 'मीडिया पर्सन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सीईओ अविनाश पांडे यांना इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग असोसिएशनने ((International Advertising Association- IAA)) हा सन्मान दिला होता. 


तसेच या वर्षी अविनाश पांडे यांना ENBA कडून 'बेस्ट सीईओ' पुरस्कारही मिळाला आहे. तर एबीपी माझाच्या मास्टर स्ट्रोक (Master Stroke Show)  शोला 'बेस्ट न्यूज करंट अफेयर्स'चा पुरस्कार मिळाला. याशिवाय एबीपीच्या 'अनकट'ला बेस्ट न्यूज करंट अफेयर्स (Uncut Best News Current Affairs Show) कार्यक्रम हिंदीसाठी गोल्ड आणि एबीपीच्या 'भारत का युग'ला (Bharat Ka Yug) सर्वोत्कृष्ट न्यूज कव्हरेजचा पुरस्कार (Award for Best News Coverage) मिळाला.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Royal Enfield: भारतानंतर 'या' देशात होते रॉयल एनफिल्डची सर्वाधिक विक्री! थायलंड, कोलंबिया आणि अर्जेंटिनामध्ये ही आहे कंपनीचे ग्राहक