मुंबई : कंडोमच्या (Condoms) वापराबाबत जनजागृती करण्यासाठी जगभरात अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. भारतासोबतच अनेक देशांमध्ये देखील कंडोमच्या वापराबाबत जगजागृती करण्यासाठी अनेक नव-नवीन उपक्रम राबवले जातात. कंडोमचा वापर वाढण्यासाठी आता फ्रान्समध्ये तर सरकारने त्याचे मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतलाय. फ्रान्स सरकारच्या या निर्णयानंतर तेथील तरुणांना मोफत कंडोमचे वाटप करण्यात येणार आहे. परंतु, एकीकडे कंडोम वापराबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत असतनाना काही देशांमध्ये मात्र कंडोमच्या विक्रीवर बंदी आहेत. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये कंडोम वापरासंबंधी अनेक नियम आहेत. काही देशांमध्ये तर याबाबत आश्चर्यकारक नियमावली आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 18 ते 25 वयोगटातील तरूणांना मोफत कंडोम वाटपाची घोषणा केलीय. नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गर्भनिरोधनासाठी ही छोटीशी क्रांती असल्याचं मॅको यांचं मत आहे. ज्यांना कंडोम हवे आहे ते मेडीकलमध्ये जाऊन मोफत कंडोम मिळवू शकतील. या पूर्वी देखील फ्रान्समध्ये सरकारकडून कंडोम खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे लोकांना परत मिळत असत. याबरोबरच या वर्षाच्या सुरुवातीला फ्रान्स सरकारने 26 वर्षांपर्यंतच्या सर्व महिलांसाठी गर्भनिरोधक मोफत केले होते.
'या' देशात आहे कंडोमवर बंदी
कंडोमबाबत जनजागृती केली जात असतानाच काही देशांमध्ये कंडोमवर बंदी आहे. काही वर्षांपूर्वी स्वाझीलँडमध्ये कंडोमच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. तेथील काही लोकांना असे वाटत होते की, कंडोम वापरल्याने माणूस आपल्या स्पर्मचा गैरवापर करतो किंवा ते वाया घालवतो. त्यांच्या मते कंडोम वापरणे हे देवाच्या नियमानुसार चुकीचे आहे. त्यामुळे त्यावर बंदी घातली पाहिजे. याशिवाय अनेक देशांमध्ये कंडोमच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
जोडीदाराची संमती आवश्यक
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील एका नियमानुसार जोडीदाराच्या संमतीशिवाय शारीरिक संबंधादरम्यान कंडोम काढणे गुन्हा आहे. जर कोणी याचे पालन केले नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा परिस्थितीत शारीरिक हानीबाबत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
याशिवाय अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे कंडोम फक्त मेडीकलमधून किंवा डॉक्टरांकडूनच विकत घेता येते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी महिलांजवळ कंडोम आढळून आल्यास त्यांना वेश्याव्यवसायाचा आरोप लावून कारवाई केली जाते.
महत्वाच्या बातम्या