एक्स्प्लोर

शिस्तप्रिय संघात बंडाळी, 400 स्वयंसेवक राजीनाम्याच्या तयारीत

नागपूर : भाजपविरोधात भूमिका घेतल्यामुळे गोवा प्रांताचे संघ प्रमुख सुभाष वेलिंगकर यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे शिस्तप्रिय संघटना असणाऱ्या संघात बंडाळी सुरु झाली आहे. गोव्यातील जवळपास 400 स्वयंसेवक राजीनाम्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.   सर्वात शिस्तप्रिय संघटना म्हणून बिरुद मिरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे गोवा प्रांत प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी भाजपविरोधात आवाज उठवला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महाभारत घडलं.   संघानं सुभाष वेलिंगकरांची हकालपट्टी केली. भाजपविरोधात बोलल्यामुळे एखाद्या पदाधिकाऱ्याची अशी हकालपट्टी करण्याची ही पहिली घटना आहे. मात्र वेलिंगकरांची हकालपट्टी नाही तर पदमुक्त केल्याचा दावा संघाकडून करण्यात आला आहे.   गेल्या तीन दशकांपासून वेलिंगकर संघाचे निष्ठावान स्वयंसेवक आहेत. गोव्यातील प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण द्यावं यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या वतीनं जनआंदोलन उभारलं. गोव्यात भाजपविरोधात असताना त्याला भाजपचीही साथ होती. पण सत्ता आल्यानंतर भाजपनं घुमजाव केल्याचा आरोप वेलिंगकरांनी केला आहे.   गेल्या काही दिवसात भाजप विरुद्ध भारतीय भाषा सुरक्षा मंचाचा वाद सुरु आहे. पण मंचाच्या कार्यकर्त्यांनी गोव्याच्या दौऱ्यावर आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहांना काळे झेंडे दाखवले. कदाचित संघ नेतृत्वाला ते रुचलं नसावं आणि त्यातून त्यांना पदमुक्त केलं. त्यामुळे गोव्यातील चारशे स्वयंसेवक बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.   देशातली सर्वात मोठी आणि शिस्तप्रिय संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची ओळख आहे. त्यामुळे आजपर्यंत कुठल्याही अंतर्गत मुद्द्यावर संघाचा वाद कधीच चव्हाट्यावर आला नाही किंवा तशी वेळही संघानं येऊ दिली नाही. पण आता वेलिंगकरांची गच्छंती आणि त्यानंतर झालेली बंडाळी पाहता संघाला आपल्या करड्या शिस्तीबद्दल 'दक्ष' राहावं लागेल. हे नक्की  

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget