एक्स्प्लोर

'केरळच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 1 कोटीचं बक्षीस'

उज्जैन/ तिरुअनंतपुरम :  केरळमध्ये संघ स्वयंसेवकांच्या हत्यांविरोधात रा.स्व.संघाच्या वतीने देशभरात निदर्शने सुरु आहेत. त्यासाठी संघाच्यावतीने मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये निदर्शनं करण्यात येत होती. या निदर्शनावेळी संघाच्या एका नेत्याने केरळच्या मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन नवा वाद ओढवून घेतला आहे. कुंदन चंद्रावत असं संघाच्या या नेत्याचं नाव आहे. चंद्रावत यांनी केरळच्या मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची हत्या करणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस जाहीर केलं करुन हा वाद निर्माण केलाय. चंद्रावत आपल्या घोषणेवर ठाम असून, बक्षीसाची रक्कम उभी करण्यासाठी आपण आपलं घर विकणार असल्याचंही सांगितलंय. चंद्रावत यांच्या वक्तव्याला उत्तर म्हणून मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानेही चंद्रावत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केरळचे माकप सचिव कोदियेरी बालकृष्णन यांनी चंद्रावत मुख्यमंत्र्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत, असं म्हणलं आहे. तसेच संघाने माकपच्या वाट्याला जाऊ नये, असा इशारा दिलाय. केरळमध्ये संघ स्वयंसेवकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये बुधवारी जनाधिकार समितीच्या वतीनं एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना उज्जैनचे प्रांत प्रचारक चंद्रावत यांनी, जो व्यक्ती केरळच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करेल, त्यांना मी माझ्या संपत्तीमधून एक कोटी रुपये बक्षीस देईन. असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसेच या देशातील गद्दारांना देशात राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे मी या बक्षिसाची घोषणा करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तर दुसरीकडे चंद्रावत यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी खेद व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशमधील माकपचे राज्य सरचिटणीस बादल सरोज यांनी यासंदर्भात गुरुवारी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करुन संघाच्या पदाधिकाऱ्याचे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचं म्हणलं आहं. त्यामुळे राज्यातील पोलीस याप्रकरणी योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशचे विरोधी पक्षनेते अजय सिंह यांनी यावर प्रतिक्रिया देताना, चंद्रावत यांचे हे वक्तव्य उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी केलं असल्याचं म्हणलं आहे. तर काँग्रेसचे आमदार मुकेश नायक यांनी चंद्रावत यांचं हे वक्तव्य तालिबानी मानसिकता दर्शवत असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता के.के मिश्रा यांनी तर चंद्रावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, चंद्रावत यांच्या या वक्तव्यावरुन संघाने आपले हात वर केले आहे. भोपाळमधील संघाच्या निदर्शनावेळी संघाचे अखिल भारतीय सह प्रचारप्रमुख जे. नंदकुमार यांनी केरळमध्ये सुरु असलेल्या घटनांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यातूनच अनेकजण आपलं मत नोंदवत आहेत. पण संघ त्याचं समर्थनही करत नसल्याचं सांगितलंय. संबंधित बातम्या : केरळमध्ये संघ कार्यालयाबाहेर स्फोट, 4 स्वयंसेवक जखमी

महत्त्वाच्या बातम्या

NCP Leader Amit Shah Meeting: दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime News: डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
Chhaya Kadam on Ravi Jadhav: 'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
Satara Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
NCP Leader Amit Shah Meeting: दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
Maharashtra District bank Election Result 2026: सातारा आणि सांगली, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
सातारा आणि सांगली, नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
IND vs NZ पहिल्या वनडेआधी सराव सत्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना... स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
IND vs NZ पहिल्या वनडेआधी सराव सत्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना... स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
Embed widget