एक्स्प्लोर

रेल्वेच्या तिकीटांच्या 'काळा' बाजाराचं दहशतवादी कनेक्शन, रेल्वे पोलिसांकडून 28 जणांना अटक

आरपीएफनं ई-तिकीटांमध्ये काळाबाजार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यातील 28 जणांना आरपीएफ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी ब्लॅक तिकीटांचा पैसा अतिरेक्यांच्या मदतीसाठी वापरत असल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली : ब्लॅकनं तिकीट खरेदी केल्यानं तुमचा पैसा हा देशातील अतिरेकी घटनांसाठी वापरला जात असल्याची शक्यता आहे. कारण रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने ई- तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील 28 जणांना आरपीएफच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काळाबाजार करणाऱ्या या टोळीची पाळमुळं दुबई, सिंगापूर, पाकिस्तानमध्ये असल्याची शक्यता आहे. गुलाम मुस्तफाचा मोठा खुलासा काळ्या बाजाराशी संबंधित गुलाम मुस्तफा या व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. मुस्तफाची 10 दिवस चौकशी करण्यात आली. या चौकशीत काळ्या बाजाराशी संबंधित व्यक्ती तसेच टोळ्यांची माहिती त्यानी दिली आहे. रेल्वेच्या तिकिटांच्या काळाबाजारासाठी या टोळीने एक सॉफ्टवेअर विकसित केले होते. शेकडो आयडींच्यामार्फत हा खेळ सुरु होता. यावरुन काही मिनिटांत ही टोळी हजारो तिकिटांचा काळाबाजार करीत होती. दरम्यान, या रॅकेटच्या तिकिटांच्या काळाबाजारामुळे काही गरजवंतांना तिकिट उपलब्ध होऊ शकत नव्हते. सिंगापूर येथील एका सॉफ्टवेअर कंपनीने मदत केली असून मनी लॉंडरिंग संबंधित सिंगापूर पोलिस तपास करत आहे. AC local | मध्य रेल्वेची 29 जानेवारीपासून एसी लोकल धावणार | ABP Majha आरपीएफचे डीजी अरूण कुमार म्हणाले, या टोळीमध्ये एकूण 215 जणांचा समावेश आहे. टोळीच्या सेकेंड लेअरमध्ये 18 लोक आहे. या टोळीतील 28 जणांना आरपीएफच्या पोलिसांनी अटक केली आहे. रोकड मिळवल्यानंतर हे लोक या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करीत होते. अटक करण्यात आलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या काळ्याबाजाराची मुळं आर्थिक घोटाळ्यांशी जोडलेली आहेत. इतकेच नव्हे मुस्तफाच्या लॅपटॉपमध्ये पोलिसांना एक अॅप्लिकेशन मिळाले आहे. या अॅप्लिकेशन वापर करून बनावट आधार कार्ड तयार केले जातात. टोळीचा मास्टरमाईंड गुरूजी टेक्नॉलॉजीचा दुरूपयोग करून ही टोळी पैसे कमवत होती. टोळीचा मास्टमाईंड गुरूजी आहे. दीड महिन्यात गुलाम मुस्तफाच्या बँक खात्यातून 17 लाख रूपये गुरूजीच्या खात्यात पाठविण्यात आले आहे. या टोळीचा संबंध तहरिक- ए- पाकिस्तानशी आहे. दुबई, पाकिस्तान, बांगलादेश आणि यूगोस्लावियाच्या काही टोळ्यांचा या मागे हात आहे. मुस्तफाच्या लॅपटॉपमधून पाकिस्तानातील काही मोबाईल नंबर मिळाले आहे. या टोळीची महिन्याची कमाई 15 कोटी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Allahabad HC Decision : मुस्लिम पर्सनल लॉ कायद्यांपेक्षा मोठा नाही; बालविवाह आणि पोक्सो संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
मुस्लिम पर्सनल लॉ कायद्यांपेक्षा मोठा नाही; बालविवाह आणि पोक्सो संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; समिती अध्यक्षांच्या सचिवाचं निलंबन 
अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; समिती अध्यक्षांच्या सचिवाचं निलंबन 
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget