एक्स्प्लोर

रोटोमॅकचा 800 कोटींचा कर्ज घोटाळा, सीबीआयची छापेमारी सुरु

बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. कानपूरमध्ये तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

कानपूर : पीएनबी घोटाळा ताजा असतानाच देशातील पेन बनवणारी मोठी कंपनी रोटोमॅकचाही 800 कोटींचा कर्ज घोटाळा समोर आला आहे. सीबीआयने रोटोमॅकविरोधात गुन्हा दाखल केला असून छापेमारी सुरु केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. कानपूरमध्ये तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली. घोटाळ्यांच्या आरोपांनंतर कंपनीचे मालक विक्रम कोठारी देशातून फरार झाल्याचं वृत्त होतं. मात्र रविवारी एका लग्न समारंभात ते दिसून आले. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह दिग्गज राजकीय नेते आणि उद्योगपती उपस्थित होते. रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांनी सरकारी बँकांकडून जवळपास 800 कोटी रुपयांचं कर्ज एक वर्षापूर्वी घेतलं होतं. मात्र अजूनही ते भरलेलं नाही. कानपूरच्या टिळक नगरमध्ये विक्रम कोठारीचा आलिशान बंगला आहे, मात्र ते सध्या बंगल्यात राहत नाहीत. तर पनकी दादा नगर भागात कारखाना आहे, जो बंद आहे. कानपूरच्या माल रोडच्या सिटी सेंटरमध्ये रोटोमॅकचं कार्यालय आहे, तेही सध्या बंद अवस्थेत आहे. ''रोटोमॅकला युनियन बँकेने 485 कोटींचं कर्ज दिलेलं आहे आणि हे कर्ज वसूल करण्यासाठी कोठारींची जी संपत्ती बँकेकडे गहाण ठेवलेली आहे, ती विकली जाणार आहे,'' असं युनियन बँकेचे मॅनेजर पीके अवस्थी यांनी सांगितलं. ''विक्रम कोठारी यांच्याकडून 352 कोटींची वसुली करायची आहे. पैसा वसूल न झाल्यास ते अकाऊंट बुडीत कर्जामध्ये (एनपीए) जाईल. त्यांची जी जमीन बँकेकडे आहे, ती विकण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यातून पैसा वसूल केला जाईल,'' असं अलाहाबाद बँकेचे मॅनेजर राजेश यांनी सांगितलं. बँक कोणत्याही व्यक्तीला कर्ज देते तेव्हा ते वसूल करण्यासाठी अनेकदा अडचणी येतात किंवा कर्जदार ते परत करण्यास असमर्थ ठरतात. त्यानंतर बँक त्यांना नोटीस पाठवते की कर्ज भरा किंवा तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यानंतरही रक्कम न भरल्यास संबंधित व्यक्तीचं खातं बुडीत कर्जामध्ये जातं.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget