एक्स्प्लोर

'करावे तसे भरावे', रॉबर्ट वढेरांचा केजरीवालांवर निशाणा

नवी दिल्ली: दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर केलेल्या भष्ट्राचाराच्या आरोपानंतर सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. 'करावे तसे भरावे', अशा शब्दात वढेरा यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. रॉबर्ट वढेरा यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक सविस्तर पोस्ट लिहून केजरीवाल यांच्यावर घणाघाती टीका केली. 'तुम्ही जे पेरता तेच उगवतं. ज्यांनी 2010पासून माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले त्यांच्यावरच आज भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात आहेत. ते देखील त्यांच्याच लोकांकडून. तसेच त्यांच्याकडे पुरावेही असल्याचं ती लोकं सांगत आहेत. मी केजरीवाल यांना शुभेच्छा देतो आणि आशा करतो की, या प्रकरणी त्यांच्यावर कोणाताही डाग लागणार नाही. कारण की, ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे किमान त्यांचा विश्वास तरी ते तोडणार नाहीत.' असं वढेरा म्हणाले. 2012 साली केजरीवाल यांनी वढेरांवर केले होते आरोप: 2012 साली अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर अनेक आरोप केले होते. 'एका रिअल इस्टेट कंपनीनं वढेरा यांना 65 कोटींचं कर्ज दिलं. त्यासाठी कोणतीही गोष्ट तारण ठेवण्यात आलेली नव्हती. तसेच यासाठी कोणतंही व्याज आकारण्यात आलेलं नाही.' असा केजरीवाल यांनी आरोप केला होता. कपिल मिश्रांचे केजरीवाल यांच्यावर धक्कादायक आरोप:  अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. सत्येंद्र जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिल्याचं आपण स्वतः पाहिलं, असा सनसनाटी आरोप मिश्रा यांनी केला आहे. 50 कोटींच्या जमीन व्यवहारासाठी हे पेसै दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केजरीवालांच्या एका नातेवाईकासाठी जमीन व्यवहार प्रकरणी ही पैशांची देवाणघेवाण झाल्याचा दावा मिश्रांनी केला आहे. जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये देताना मी स्वत: पाहिलं, त्यानंतर रात्रभर झोपू शकलो नाही, असंही कपिल मिश्रा म्हणाले. दिल्लीच्या जल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रिपदावरुन कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मिश्रा हे कुमार विश्वास यांचे निकटवर्तीय नेते मानले जातात. भ्रष्टाचाराविरोधात लढत असल्याचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांच्या प्रतिमेला कपिल मिश्रांच्या आरोपाने धक्का लागला आहे. एकूणच आम आदमी पक्षातला अंतर्गत कलह वारंवार समोर येताना दिसत आहे. संबंधित बातम्या: केजरीवालांनी सत्येंद्र जैनांकडून दोन कोटी घेतले : कपिल मिश्रा कपिल मिश्रांच्या आरोपानंतर अण्णा हजारेंचं केजरीवालांवर टीकास्त्र

महत्त्वाच्या बातम्या

बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Abhijeet Dipke : राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget