Road Rage Case : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष  नवज्योत सिंह सिद्धू (Navjot singh sidhu) हे आज पटियाला न्यायालयात हजर राहणार आहेत.  सुप्रीम कोर्टाने 34 वर्ष जुन्या प्रकरणात सिद्धू यांना एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सन 1988 मध्ये झालेल्या एका पार्किंगच्या वादातून सिद्धू यांनी एका वृद्धाला मारहाण केली होती. त्यानंतर उपचारा दरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला. याआधी नवज्योत सिंह सिद्धू यांना दिलासा मिळाला होता. मात्र, पीडित पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी ते आज न्यायालयात हजर राहणार आहेत. 


पटियाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरिंदर पाल लाली यांनी पक्ष समर्थकांना दिलेल्या संदेशात सांगितले की, सिद्धू सकाळी 10 वाजता न्यायालयात पोहोचणर आहेत. पक्षाच्या समर्थकांना सकाळी 9.30 वाजता न्यायालयाच्या आवारात पोहोचण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सिद्धूची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या अमृतसरहून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पटियालाला पोहोचल्या आहेत. सुमारे 34 वर्षांपूर्वी रस्त्यावर झालेल्या हाणामारीत एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सिद्धूचे वय सुमारे 25 वर्षे होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सिद्धूला केवळ एक हजार रुपयांचा दंड ठोठावून मुक्त केले होते. याविरोधात पीडितेच्या कुटुंबीयांनी पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आणि सिद्धूला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


नेमकं प्रकरण काय  


27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु होऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंगला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. 


महत्वाच्या बातम्या: