20th May 2022 Important Events : मे महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 19 मे चे दिनविशेष.


राष्ट्रीय महत्त्वाच्या बातम्या- 


1421- दिल्लीतील पहिल्या सय्यद शासक असलेल्या खिज्र खान याचा मृत्यू झाला.


1489- पोर्तुगिजचा खलाशी वास्को दा गामा याचे भारतात पाऊल
प्रसिद्ध खलाखी वास्को दा गामा यांना केरळमधील कालिकत या ठिकाणी पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर युरोपमधून भारतात येण्याच्या समुद्री मार्गाचा शोध लागला. 


1900- हिंदीतील प्रसिद्ध कवी सुमित्रानंद पंत यांचा जन्मदिन.


1929- स्वातंत्र्यसैनिक राजकुमार शुक्ल यांचं निधन


स्वातंत्र्यसैनिक राजकुमार शुक्ल यांचं आजच्या दिवशीच निधन झालं होतं. गांधीजींनी चंपारण्य या ठिकाणी यावं आणि तिथली परिस्थिती समजाऊन घ्यावी यासाठी राजकुमार शुक्ल यांनी गांधीजींना पत्र लिहिलं होतं. त्यांच्याच विनंतीवरुन  गांधीजी चंपारण्य या ठिकाणी आले. नंतर गांधीजींनी चंपारण्यचा सत्याग्रह सुरू केला आणि पुढे इतिहास घडला. 


1932- भारतीय जहालमतवादी नेते बिपिन चंद्र पाल यांचं निधन
लाल-बाल-पाल या त्रयीमधील बिपिन चंद्र पाल यांचे आजच्या दिवशी निधन झालं. लाला लजपत राय, लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्र पाल या तीन नेत्यांनी भारतीय जहालमतावादाचे नेतृत्व केलं आणि युवकांना प्रेरित केलं. भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये 1905 ते 1920 हा कालखंड जहालमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. 


1957- स्वातंत्र्यसेनानी आणि आंध्रचे पहिले मुख्यमंत्री टी प्रकाशम यांचे निधन
भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतलेले स्वातंत्र्यसैनिक टी प्रकाशम यांचे आज निधन झाले. भाषिक आधारावर देशातील पहिले राज्य म्हणून आंध्र प्रदेशची निर्मिती झाली होती. त्यावेळी आंध्रचे पहिले मुख्यमंत्री म्हणून टी प्रकाशम यांनी शपथ घेतली. 


1965- अवतार सिंग चिमा यांनी माऊंट एवरेस्ट सर केले
आजच्या दिवशी अवतार सिंह चिमा याने माऊंट एवरेस्ट सर केले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय होता. कॅप्टन कोहली यांच्या नेतृत्वाखाली 9 जणांची टीम जगातल्या सर्वात मोठ्या शिखराला सर करण्यासाठी निघाली होती. त्यावेळी अवतार सिंह चिमा याने ही कामगिरी केली.


1998- मल्टीबॅरल रॉकेट प्रणाली ‘पिनाका’ चे पहिल्यांदाच यशस्वी परिक्षण करण्यात आलं. 


आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी


1873- ब्लू जीन्सचे पेटंट
लेवी स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस या दोघांना ब्लू जीन्सचे अमेरिकेमध्ये पेटंट मिळालं. 


1875- वेगवेगळ्या मानकांसंबंधीच्या इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्सच्या करारावर 17 देशांच्या सह्या
मीटर, किलो ग्रॅम, सेकंद अशा वेगवेगळ्या मानकांसंबंधीच्या इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्सच्या करारावर 17 देशांनी सह्या केल्या. 


1902- क्युबाला अमेरिकेपासून स्वातंत्र्य
क्युबा वसाहतीवर अमेरिकेची सत्ता होती. आजच्याच दिवशी क्युबा अमेरिकेच्या जोखडातून मुक्त झाला. पण त्यानंतरही क्युबा आणि अमेरिकेमध्ये सुप्त संघर्ष सुरूच राहिला आणि आजतागायत तो सुरू आहे. 


1923- जपानमधील कामाकुरामध्ये झालेल्या भूकंपामध्ये 30 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. 


1927- सौदी अरब या देशाला ब्रिटन साम्राज्यापासून मुक्ती मिळाली.


1995- रशियाने पहिले मानवविरहित यान स्पेक्त्र ची यशस्वी चाचणी घेतली.