RK Singh on Soniya Gandhi :  काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वात असलेल्या युपीए सरकारमधील (UPA Government) केंद्रीय गृह सचिव आर के सिंह (RK Singh) यांनी सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्याविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी यावेळी म्हटलं की, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांचे निर्णय बदलून टाकायच्या. आर. के. सिंह हे सध्याच्या एनडीए सरकारमध्ये केंद्रीय उर्जामंत्री आहेत. 


एबीपी न्यूजचा विशेष कार्यक्रम नाश्ते पर नेताजी या कार्यक्रमात का खुलासा मंत्री आर के सिंह यांनी केला आहे. यावेळी त्यांना, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामात किती अंतर आहे, याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आर.के. सिंह यांनी भाष्य करत मनमोहन सिंह यांच्या काळातील अनेक खुलासे केले आहेत. 


आर. के. सिंह यांनी काय म्हटलं?


या प्रश्नाचं उत्तर देताना आर.के.सिंह यांनी म्हटलं की, 'डिझास्टर मॅनेजमेंट हे आमच्या सरकारच्या काळात सुरु झालं. त्यावेळी मी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये संयुक्त सचिव होतो. आम्ही त्याचा ड्राफ्ट बनवला होता. यामध्ये आम्ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तयार केले होते. त्याचे प्रमुख पंतप्रधान असतील असे ठरले. त्याचे सदस्य केंद्रीय मंत्री असतील. पण त्यावेळी असं होऊ नये असं एक पत्र सोनिया गांधी यांनी त्यावेळी लिहिलं होतं. असे पत्र सोनिया गांधी यांनी यावेळी लिहिले. त्याचे सदस्य पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती असाव्यात. तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी मला हे पत्र दाखवले. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की, हे योग्य नाही. शिवराज पाटील यांना देखील माझं म्हणणं पटलं. पण  20 ते 25 दिवसांनंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडून सोनिया गांधीचं पत्र आलं फक्त त्यावर फक्त मनमोहन सिंह यांच्या सह्या होत्या.' 


त्यांनी स्वतंत्र्यपणे निर्णय घेतले असते तर... - आर.के. सिंह


आर. के. सिंह यांनी पुढे बोलताना म्हटलं की, मनमोहन सिंह ही खूप चांगली व्यक्ती आहे. पण जर त्यांनी स्वतंत्र्यपणे निर्णय घेतले असते, तर असं झालं नसतं. दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे व्हिजन पाहतात. यंदाच्या लोकसभेतही जिंकणारच असल्याचं त्यांनी म्हटलंय. मी लोकांसाठी खूप काम केलंय, त्यामुळे हे मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो. 






ही बातमी वाचा : 


Raj Thackeray: राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर भाजपला पहिला धक्का, ठाण्यातील उत्तर भारतीय पदाधिकारी थेट मातोश्रीवर