Gold Silver Price: दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होताना दिसत आहे. वाढत्या सोन्याच्या दरामुळं ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. आजही सोन्याच्या दरात वाढ झालीय. आज सोन्यानं 71500 रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर चांदी 83 हजार रुपयांच्या जवळ गेली आहे. चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. पुढच्या काही दिवसात चांदी 83000 रुपयांच्या पुढ जाण्याची शक्यता आहे. 


सोन्याच्या दरात 243 रुपयांची वाढ


मिळालेल्या माहितीनुसार MCX सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झालीय. आज सोन्याच्या दरात 243 रुपयांची वाढ झालीय. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी 71,583 रुपये मोजावे लागत आहेत. काल सोन्याचा दर हा 71340 होता. तर दुसऱ्या बाजूला चांदी देखील विक्रमी पातळीवर पोहोचलीय. 83000 जवळच चांदीचे दर पोहोचले आहेत. सध्या बाजारात चांदीचा दर हा 82,877 रुपयांवर पोहोचला आहे. आज यामध्ये 427 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सोन्याबरोबर चांदीच्या दरानं देखील विक्रमी किंमत गाठली आहे.


कोणत्या शहरात सोन्याला किती दर?


चेन्नई - 24 कॅरेट सोने 72,110 रुपये प्रति 10 ग्रॅम
मुंबई - 24 कॅरेट सोने 72 110 रुपये
दिल्ली - 24 कॅरेट सोने 72,260 रुपये
कोलकाता - 24 कॅरेट सोने 72110 रुपये 
अहमदाबाद - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये 
पुणे - 24 कॅरेट सोने 72,110 रुपये
लखनौ - 24 कॅरेट सोने 72,260 रुपये
जयपूर - 24 कॅरेट सोने 72,260 रुपये
पाटणा - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये 
चंदीगड - 24 कॅरेट सोने 72,260 रुपये 


लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात मोठी वाढ


सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अशातच दिवसेंदिवस सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या स्थितीमुळ सोनं खरेदी करावं की नको? असा प्रश्न खेरदीदारांपुढे उपस्थित होत आहे. दरम्यान, सामान्य माणसाला सोनं खरेदी करणं सोपं राहिलं नाही. कारण सोन्याचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळं सामान्य ग्राहक सोने खरेदीकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Gold Rate Hike : सोन्याला झळाली, चांदीही महागली! आज तुमच्या शहरातील सोने-चांदीचा लेटेस्ट दर काय?