एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'मिशन काश्मीर', वीरप्पनला ठार करणारा अधिकारी काश्मीरमध्ये!

एकीकडे राज्य अस्थिर झालं असताना, दुसरीकडे दहशतवादी कारवायांवरही सरकारचं लक्ष आहे. दहशवादी कारवायांना उत्तर देण्यासाठी सरकारने हालचाली वाढवल्या आहेत.

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता तिथे राज्यपाल शासन लागू झालं आहे.राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्याची सूत्रं हाती घेतली आहेत. एकीकडे राज्य अस्थिर झालं असताना, दुसरीकडे दहशतवादी कारवायांवरही सरकारचं लक्ष आहे. दहशवादी कारवायांना उत्तर देण्यासाठी सरकारने हालचाली वाढवल्या आहेत. त्यासाठीच सरकारने जम्मू काश्मीरमध्ये बडे अधिकारी आणण्याचा निर्णय घेतला आहे. छत्तीसगड केडरचे वरिष्ठ आयएएस बीवीआर सुब्रमण्यम यांना जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्त केलं आहे. याशिवाय दुसरी महत्त्वाची नियुक्ती म्हणजे, राज्यपालांचे सल्लागार म्हणून आयपीएस विजय कुमार यांना नियुक्त करण्यात आलं आहे. बीवीआर सुब्रमण्यम आणि विजयकुमार हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोण आहेत विजयकुमार? कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन हे नाव दक्षिणेसह संपूर्ण भारताला परिचीत आहे. चंदनासह हत्तीच्या दातांच्या तस्करी आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्त्यांमुळे वीरप्पनची दहशत होती. सरकारने त्याला पकडण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च केले होते. तीन राज्यांचे पोलीस वीरप्पनच्या मागावर होते. मात्र IPS विजयकुमार यांनी ऑपरेशन कोकून अंतर्गत, 18 ऑक्टोबर 2004 रोजी वीरप्पनचा खात्मा केला होता. त्यांनी याबाबत एक पुस्तकही लिहिलं आहे. विजयकुमार 1975 मध्ये तामिळनाडू केडरमधून आयपीएस झाल्यानंतर, त्यांनी स्पेशल सिक्युरिटी ग्रुपमध्ये सेवेला सुरुवात केली. विजयकुमार यांची स्पेशल टास्क फोर्समध्ये बदली झाल्यानंतर, त्यांच्यावर वीरप्पनला मारण्याची जबाबदारी दिली होती. विजयकुमार यांनी अनेक वर्ष वीरप्पनचा शोध घेतला. ऑपरेशन ‘कोकून’ही सुरु केलं. जोपर्यंत वीरप्पनला मारणार नाही, तोपर्यंत डोक्याचे केस कापणार नाही, अशी शपथ विजयकुमार यांनी बन्नारी अम्मान मंदिरात घेतली होती. 18 ऑक्टोबर 2004 रोजी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तामिळनाडूतील धरमपुरी जंगलात झालेल्या चकमकीत वीरप्पनला ठार केलं होतं. ‘वीरप्पन चेंजिंग द ब्रिगांड’ हे पुस्तक विजय कुमार यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी वीरप्पनच्या बालपणापासून ते डाकू बनण्यापर्यंतचा प्रवास लिहिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्रABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठराव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
Embed widget