स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई देशात आठव्या स्थानावर आहे. या यादीत पहिला क्रमांक मध्य प्रदेशातील इंदूर शहराने मिळवला आहे.
दुसरीकडे अस्वच्छ शहरांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीतलं गोंडा हे सर्वात तळाला आहे.
यंदा स्वच्छ सर्वेक्षणात 434 शहरांचा सहभाग होता. स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 50 पैकी 12 शहरं ही गुजरातमधली आहेत .
तर उत्तर प्रदेश हे स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात तळाला आहे. सर्वात अस्वच्छ शहरांमधे 20 शहरं एकट्या यूपीमधली आहेत
अर्थात वाराणसीचा क्रमांक मात्र मागच्यावेळी 400 च्या घरात होता, तो यावेळी 32 वर सुधारला आहे.
टॉप टेन स्वच्छ शहरं
- इंदूर- मध्य प्रदेश
- भोपाळ - मध्य प्रदेश
- विशाखापट्टणम - आंध्र प्रदेश
- सुरत- गुजरात
- म्हैसूर- कर्नाटक
- तिरुचिरापल्ली- तामिळनाडू
- नवी दिल्ली -
- नवी मुंबई - महाराष्ट्र
- तिरूपती - आंध्र प्रदेश
- बडोदा- गुजरात
स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील किती शहरं?
8 - नवी मुंबई
13- पुणे
29- मुंबई
56- शिर्डी
72- पिंपरी चिंचवड
76- चंद्रपूर
www.abpmajha.in
89- अंबरनाथ
115 - सोलापूर
116- ठाणे
124- धुळे
130- मीरा भाईंदर
137 - नागपूर
139- वसई-विरार
141 - इचलकरंजी
151 - नाशिक
157 - सातारा
158 - पुळगाव - बदलापूर
www.abpmajha.in
162 - जळगाव
170 - पनवेल
177 - कोल्हापूर
181 - नंदुरबार
183 - अहमदनगर
192 - नांदेड- वाघाला
207 - उल्हासनगर
219 - उस्मानाबाद
229 - परभणी
230- यवतमाळ
231 - अमरावती
234 - कल्याण-डोंबिवली
237- सांगली-मिरज-कुपवाड
239- मालेगाव
240 - उदगीर
287 - बार्शी
296 - अकोला
299- औरंगाबाद
www.abpmajha.in
302- बीड
311 - अचलपूर - अकोला
313 - वर्धा
318 - लातूर
343 - गोंदिया
355 - हिंगणघाट -
368 - जालना
392- भिवंडी निजामपूर
433 - भुसावळ
नवी मुंबई कसं झालं स्वच्छ?
गेल्या दोन वर्षात नवी मुंबई महापालिकेने राबविलेल्या विविध योजनांमुळे हा पुरस्कार पालिकेच्या झोळीत आला आहे. यामध्ये संपूर्ण शहरात टॉयलेट उभारणे, शहरातील घणकचऱ्याचे योग्य नियोजन, भिंतींना पेटिंग करणे, रस्त्यालगतच्या उद्यानांचे सुशोभिकरण करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहर हागणदारीमुक्त बनवण्यासाठी 1950 वैयक्तिक, 666 कम्युनिटी आणि 80 सार्वजनिक टॉयलेटची उभारणी पालिकेने केली आहे. शहरातून जाणारे सायन-पनवेल हायवे, पाम बीच रोड, ठाणे- बेलापूर हायवेवर ई-टॉयलेटची उभारणी करून वाहतूकदारांची सोय केली.
शहरात दररोज 750 मेट्रिक टन घणकचरा गोळा होते. यामध्ये ओला आणि सुका कचरा एकत्र होत असल्याने त्याचे वर्गीकरण करणे अवघड झाले होते. त्यामुळे प्रत्येक सोसायटींना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे फर्मान पालिकेने सोडले होते. ज्या सोसायट्या हा नियम पाळत नव्हत्या त्यांचा कचरा उचलने बंद केल्यानंतर रहिवाशांना ओला-सुका कचरा वेगळा करण्यास सुरुवात केली. यातून 150 मेट्रिक टन ओला कचरा वेगळा झाल्याने त्याच्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्यात आली. तर सुक्या कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करून त्याचा पुर्नवापर करण्यात येत आहे.
शहर स्वच्छ दिसतानाच आकर्षक होण्यासाठी पालिकेने महत्वाचे चौक, रस्ते, उद्यानांच्या भिंती रंगवल्या. या भिंतीवर प्राण्यांची, पक्षांची आकर्षक चित्रे काढली. तर काही ठिकाणी समाज प्रबोधनात्मक वाक्य प्रचार, संदेश लिहून जनजागृती केली. रस्त्यांच्या दुजाभकावर उद्याने उभा करून, झाडे लावून सुशोभिकरण करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई 'टॉप-10'मध्ये!