हैदराबाद : हैदाराबादमधील आरजे (रेडिओ जॉकी) संध्या सिंह यांच्या आत्महत्येप्रकरणी पतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आर्मीमध्ये मेजर असलेले पती वैभव विशाल यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


संध्या सिंह यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत बोलारममधील आर्मीच्या क्वॉर्टर्समध्येच आढळला होता. 18 एप्रिलला 30 वर्षीय मेजर वैभव विशाल यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. वैभव विशाल यांचं पोस्टिंग आर्मीच्या सिकंदराबादेतील 54 व्या इन्फंट्री डिव्हिजनमध्ये करण्यात आलं होतं.

कलम 304 ब (हुंडाबळी मृत्यू) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या सिंह यांची बहीण उमाने गाझियाबादमध्ये तक्रार दाखल केली होती. हुंड्यासाठी पती वैभव, सासू आशा सिंह आणि नणंद खुशी उर्फ मेघा रायकडून होणाऱ्या छळामुळे संध्या यांनी आत्महत्या केल्याचा आरोप बहिणीने केला आहे. दोघांच्या लव्ह मॅरेजनंतर लगेचच संध्या यांचा

संध्या यांनी आत्महत्या केल्याची माहिती 18 एप्रिलला पहाटे 3.15 वाजता पोलिसांना मिळाली. आर्मी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं होतं. 17 एप्रिलच्या रात्री 10 वाजता पती आणि आरोपी विशाल यांनीच त्यांना अखेरचं पाहिलं होतं.