Restrictions Return in Delhi : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं देशातील सर्वच राज्य सरकारांनी निर्बंध लागू केले आहेत. अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्यात आले आहेत. परंतु, दिल्लीमध्ये कालपासून (मंगळवारी) निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याला मिनी लॉकडाउन (Mini Lockdown) किंवा सेमी लॉकडाउन (Semi Lockdown) म्हणू शकता. दिल्लीमधील कोरोनाचा वाढता आकडा पाहता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


दिल्लीत ओमायक्रॉनची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतेय. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दिल्लीत रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल. तर मेट्रो, रेस्टॉरंट, बार 50 टक्के क्षमतेने सुरु असतील. याशिवाय सिनेमा हॉल, स्पा, जिम, मल्टीप्लेक्स, हॉल, ऑडिटोरियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात


दिल्लीत काय सुरु, काय बंद?



  • दिल्लीमध्ये आता पुढील आदेशापर्यंत शाळा, कॉलेज, सिनेमाहॉल, बॅक्वेंट हॉल, जिम, स्पा बंद राहतील परंतु, लेकिन सलून सुरु राहतील

  • दुकानं आणि मॉल सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील. ऑड-ईव्हन नियमानुसार, दुकानं आणि मॉल सुरु राहतील

  • मेट्रो आणि बस 50 टक्के क्षमतेनं सुरु राहतील. मेट्रो आणि बसमध्ये उभं राहण्याची परवानगी नाही. 

  • ऑटो, ई-रिक्शा, टॅक्सीमध्ये केवळ 2 प्रवाशांनाच परवानगी 

  • रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत रेस्टॉरंट सुरु राहतील 

  • खाजगी कार्यालयं 50 टक्के क्षमतेसह सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील 

  • लग्नात केवळ 20 लोकांना परवानगी

  • धार्मिक स्थळांच्या ठिकाणी परवानगी नाही 


देशाच्या राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव 


दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 496 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अनेक महिन्यांनी दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळालं. तसेच कोरोना संसर्गाच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये 331 रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, आता हा रेकॉर्डही मोडीत निघाला असून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या दिल्लीतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1612 वर पोहोचली आहे. 


दिल्लीत कोरोना 'आउट ऑफ कंट्रोल'


झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं दिल्लीमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या राजधानीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे दिल्लीमध्ये रात्री दहा वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सिनेमा हॉल, बँक्वेट हॉल, स्पा बंद करण्यात आले आहेत. रेस्टॉरंटही 50 टक्के उपस्थितीसह सुरु आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी आपल्या संबोधनात म्हटलं की, दिल्लीतील कोरोना स्थितीवर लक्ष असून बदलणारी स्थितीचा आढावा घेऊन निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्या तरी राजधानीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. चिंतेची बाब म्हणजे, सध्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Coronavirus Update : देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ? दिल्लीत 496, तर मुंबईत 1377 दैनंदिन कोरोना रुग्ण