मुंबई : 'बचपन का प्यार' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेल्या छत्तीसगडचा गायक सहदेव दिरदोचा अपघात झाला आहे. अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर सहदेवला रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्याची प्रकृत्ती गंभीर आहे. सहदेवचा अपघात झाला असून सध्या तो कोम्यात असल्याची माहिती प्रसिद्ध रॅपर बादशाह यांने दिली आहे. 


 






'बचपन का प्यार' या गाण्यामुळे रातोरात स्टार बनलेला सहदेव हा छत्तीसगडच्या सुकमाचा रहिवासी आहे. मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास तो मित्रांसोबत टू व्हीलरने जात असता त्याचा अपघात झाला. या अपघातात सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं समजतंय. आता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.  


सहदेवने 2019 साली त्याच्या शाळेत 'बचपन का प्यार' हे गाणं म्हटलं होतं. त्याच्या शिक्षकांनी हा व्हिडीओ काढला होता आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की सहदेव रातोरोत स्टार बनला. त्याच्या या गाण्याची दखल घेत रॅपर बादशाहने एक रिमिक्स गाणे तयार केले. 


बादशाहने सहदेवसोबत बनवलेलं 'बचपन का प्यार' या गाण्याचे व्हर्जन चांगलंच हिट झालं. यूट्यूबवर या गाण्याला तब्बल 340 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यानंतर सहदेव दिरदो सोशल मीडियावर चांगलाच ट्रेन्डिंगमध्ये आला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही त्याच्या गाण्याचं कौतुक केलं. 


महत्त्वाच्या बातम्या :