एक्स्प्लोर
तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे चार अॅप असतील तर त्वरित डिलीट करा!

नवी दिल्ली : जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे चार अॅप असतील तर ते तातडीने डिलीट करा, असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयानेच याबाबत अलर्ट जारी करुन, हे अॅप त्वरित हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या अॅपद्वारे पाकिस्तानी यंत्रणा हेरगिरी करत असल्याचं समोर आलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? पाकिस्तानी एजन्सी भारतात मोबाईल अॅपमध्ये मालवेअर व्हायरस पाठवून हेरगिरी करत आहे. गृह मंत्रालयाला या माहितीचा ठोस अहवाल मिळाल्यानंतर, देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा आणि राज्यांच्या गुप्तचर यंत्रणांना पत्र लिहून काही ठराविक मोबाईल अॅप डाऊनलोड न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय माजी सैनिकांना नोकरी देण्याच्या नावावर, आर्थिक मदत देण्याच्या बहाण्याने हेरीगिरीचा प्रयत्न केल्याची सात प्रकरणं समोर आली. त्यानंतर अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. या अॅपपासून दूर राहा गृहमंत्रालयाने ज्या अप्सपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत, त्यात टॉप गन (गेम अॅप), एमपीजंक (म्यूजिक अॅप), व्हिडीजंक (व्हिडीओ अॅप) आणि टॉकिंग फ्रॉग (एंटरटेन्मेंट अॅप)चा समावेश आहे. गृह मंत्रालयानुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा या अपमध्ये व्हायरस पाठवून गोपनीय माहिती मिळवत आहे.
Before You Go
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















