एक्स्प्लोर

मुकेश अंबानींचा सख्ख्या भावाला मदतीचा हात, जिओकडून आरकॉमची खरेदी

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने रिलायन्स कम्यूनिकेशन (आरकॉम)चे स्पेक्ट्रम, मोबाईल टॉवर आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कसह इतर मोबाईल उद्योगांची खरेदी केली आहे.

नवी दिल्ली : दिवाळखोरीच्या गर्तेत सापडलेल्या अनिल अंबानींना त्यांचे बंधू मुकेश अंबानींनी मदतीचा हात पुढे केला आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने रिलायन्स कम्यूनिकेशन (आरकॉम)चे स्पेक्ट्रम, मोबाईल टॉवर आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कसह इतर मोबाईल उद्योगांची खरेदी केली आहे. यामुळे दिवाळखोरीकडे झुकलेल्या अनिल अंबानींना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या आरकॉमवर तब्बल 45 हजार कोटीचं कर्ज आहे. हे चुकवण्यासाठी अनिल अंबानींची जीवतोड मेहनत करत आहेत. हे कर्ज चुकवण्यासाठी चीनच्या एका बँकेने कंपनीला नॅशनल नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT)मध्ये खेचले होते. त्यामुळे कंपनीला टाळे लागण्याची शक्यता होती. त्यातच आता मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने अनिल अंबानींना मदतीचा हात पुढे केला आहे. जिओने दिलेल्या माहितीनुसार, आरकॉमसोबतच्या करारान्वये कंपनीच्या यूनिटमधून चार श्रेणीतील टॉवर, ऑप्टिकल फायबर केबलचं नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि मीडिया कनवर्जेंस नोड्स (एसीएन) संपत्तीची खरेदी करणार आहे. वास्तविक, जिओने ही सर्व संपत्ती भविष्यातील रणनितीसाठी अतिशय पूरक असल्याने खरेदी केल्याचं बोललं जात आहे. कारण, याद्वारे रिलायन्स जिओ आपल्या ‘फायबर टू होम’ आणि इतर सेवा सुरु करण्याची शक्यता आहे. सध्या या व्यवहाराबाबत सरकार आणि रेग्यूलेटरी अथोरिटीकडून मंजुरी घेणे बाकी आहे. पण ही सर्व प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या एका स्वतंत्र समूहाच्या देखरेखीखाली संपन्न झाली. तसेच, दोनवेळच्या निविदा प्रक्रियेतही जिओने चांगली बोली लावून, या निविदा आपल्या नावावर मंजूर करुन घेतल्या. दरम्यान, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आरकॉमने आपल्या देणेकऱ्यांना एका नव्या व्यवहाराला अंतिम रुप देण्याची प्रक्रिया सुरु असल्याची घोषणा मंगळवारी केली होती. या व्यवहारातून आरकॉमची संपत्ती विकून कंपनी 40 हजार कोटी रुपये जमा करेल. कंपनीच्या या व्यवहाराला चिनी बँकेचीही सहमती आहे. ज्या बँकेने कंपनीला 1.80 लाख अब्ज डॉलरचं कर्ज चुकत करण्यास अपयश आल्याने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT)मध्ये खेचले होते. संबंधित बातम्या रिलायन्सचा 13 हजार 251 कोटींचा विद्युत व्यवसाय अदानींकडे अनिल अंबानींच्या आरकॉम विरोधात दिवाळखोरीची याचिका

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत कोंबलं, प्रियांका गांधींही ताब्यात, दिल्लीत प्रचंड राडा
हात-पाय धरून उचललं, राहुल गांधींना पुन्हा दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं, ठिय्या मांडलेल्या खासदारांनाही बाजूला केलं, दिल्लीत पुन्हा राडा
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा हाय होल्टेज ड्रामा, राहुल गांधी पुन्हा गनिमी काव्याने निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार
दिल्लीत पुन्हा हाय होल्टेज ड्रामा, राहुल गांधी पुन्हा गनिमी काव्याने निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
Embed widget