एक्स्प्लोर

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण, मुकेश अंबानीनी गमावले 7 अब्ज डॉलर्स, गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा तोटा

रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने मुकेश अंबानींच्या संपत्तीतही घट होऊन जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांची 9 व्या स्थानी घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सच्या अहवालानुसार मुकेश अंबानींची संपत्ती आता 71 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे

नवी दिल्ली: सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. रिलायन्सच्या शेअर्सच्या भावात घसरण होऊन ते 1890 रुपये इतके खाली आले. दुसऱ्या तिमाहीच्या परिणामांनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाल्याची पहायला मिळाले.

सोमवारच्या या घसरणीमुळे रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना तब्बल एक लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. शुक्रवारी रिलायन्सच्या संपत्तीची किंमत 13,89,159.20 कोटी रुपये इतकी होती. त्यात आता 1.12 लाख कोटींची घरसण होऊन ती आता 12,77,991.30 रुपयांवर पोहचली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये त्यांच्या प्रमोटर्सचा हिस्सा हा 50.49 टक्के इतका आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत आता जवळपास 55 हजार कोटींची घसरण झाली असून रिटेल गुंतवणूकदारांनाही 8,200 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

सोमवार संध्याकाळपर्यंत रिलायन्सच्या शेअर्समध्ये 8.62 टक्क्यांची घट नोंदवली गेली आणि त्याचे भाव 1,877.30 रुपयांवर आले. शुक्रवारी कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीचे परिणाम सादर केले गेले ज्यामध्ये कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 15 टक्क्यांची घसरण नोंदवली गेल्याचे स्पष्ट झाली आणि 9,567 कोटींचा तोटा झाला. त्याचाच परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला असून त्यामध्ये मोठी घसरण झाली.

काही विश्लेषकांच्या मते हे शेअर्स अजून घसरण्याचा अंदाज आहे तर काहींच्या मते पुन्हा या शेअर्सच्या भावात तेजी येण्याची शक्यता आहे.

मुकेश अंबानींची श्रीमंतांच्या यादीत चार स्थानाने घसरण रिलायंसच्या शेअर घसरणीचा परिणाम मुकेश अंबांनींच्या संपत्तीवरही झाला असून त्यांची जागतिक श्रीमंतांच्या यादीत चार स्थानाने घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सच्या अहवालानुसार मुकेश अंबानींच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे आणि ती आता 71 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर यादीत मुकेश अंबानी याआधी 6 व्या क्रमांकावर होते. आता त्यांची 9 व्या स्थानावर घसरण झाली आहे. संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी आता गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांच्या खाली ढकलले गेले आहेत. या वर्षी जुलैमध्ये मुकेश अंबानी जागतिक श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहचले होते.

महत्वाच्या बातम्या:

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलला जोरदार झटका, फ्यूचर ग्रुपसोबतचा करार रोखला!

जियोकडून 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; भारतात लवकरच होणार लॉन्च

टेलिकॉमनंतर रिटेल, होलसेल क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा! बिग बझारची मालकी आता मुकेश अंबानींकडे

रिलायन्स जियोची टिकटॉकमध्ये गुंतवणूक?; अधिकाऱ्यांसोबत बोलणी झाल्याची चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

Jaipur CJP Team Attacked: सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाणीनंतर अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप; आता गाववाले म्हणतात, त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या
सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाणीनंतर अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप; आता गाववाले म्हणतात, त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
Embed widget