एक्स्प्लोर

व्हिसा आणि विमान वाहतूकीतील निर्बंधांमध्ये श्रेणीबद्ध शिथिलता

अधिकृत विमानतळ आणि बंदर इमिग्रेशन चेक पोस्ट्सद्वारे हवाई किंवा जलमार्गाद्वारे टूरिस्ट व्हिसाशिवाय इतर ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना आणि इतर परदेशी नागरिकांना इतर कोणत्याही उद्देशाने भारतात भेट देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता, फेब्रुवारी 2020 पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वाहतूक कमी करण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली होती. आता भारतात येणाऱ्या आणि भारताबाहेर जाणाऱ्या परदेशी आणि भारतीय नागरिकांच्या अधिक प्रवर्गासाठी व्हिसा आणि वाहतुकीतील निर्बंधांमध्ये वर्गवारीनुसार शिथिलता आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

म्हणूनच, अधिकृत विमानतळ आणि बंदर इमिग्रेशन चेक पोस्ट्सद्वारे हवाई किंवा जलमार्गाद्वारे टूरिस्ट व्हिसाशिवाय इतर ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना आणि इतर परदेशी नागरिकांना इतर कोणत्याही उद्देशाने भारतात भेट देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये वंदे भारत मिशन, एअर ट्रान्सपोर्ट बबल व्यवस्था किंवा नागरी उड्डयन मंत्रालयाने परवानगी दिलेल्या कोणत्याही नॉन शेड्यूल व्यावसायिक उड्डाणांद्वारे चालवल्या जाणार्‍या उड्डाणांचा समावेश आहे. अशा सर्व प्रवाशांना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अलगीकरण आणि इतर आरोग्य / कोविड -19 बाबतीतील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

या श्रेणीबद्ध शिथिलतेअंतर्गत, भारत सरकारने विद्यमान सर्व व्हिसा (इलेक्ट्रॉनिक व्हिसा, पर्यटक व्हिसा आणि वैद्यकीय व्हिसा वगळता) तातडीने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा व्हिसाची वैधता कालबाह्य झाल्यास, संबंधित वर्गाचे नवीन व्हिसा संबंधित भारतीय मिशन / पोस्टवरून मिळू शकतात. वैद्यकीय उपचारासाठी भारतात येण्याची इच्छा असलेले परदेशी नागरिक वैद्यकीय व्हिसासाठी त्यांच्या वैद्यकीय परिचर्यासह अर्ज करु शकतात. या निर्णयामुळे परदेशी नागरिकांना व्यवसाय, परिषद, रोजगार, अभ्यास, संशोधन, वैद्यकीय इत्यादी विविध कारणांसाठी भारतात येणं शक्य होईल.

सरकारने इलेक्ट्रॉनिक व्हिसा, पर्यटक व्हिसा आणि वैद्यकीय व्हिसा वगळता सर्व व्हिसा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा व्हिसाची वैधता कालबाह्य झाली असेल तर नवीन व्हिसा भारतीय मिशनकडून मिळू शकतील. वैद्यकीय उपचारासाठी भारतात येण्यास इच्छुक असलेले परदेशी नागरिक, त्यांच्या वैद्यकीय सेवकासह वैद्यकीय व्हिसासाठी नव्याने अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget