पलानीसामी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री, आजच शपथ घेणार
कर्नाटक जेलकडे काल रवाना होण्याआधी शशिकला चेन्नईतल्या जयललितांच्या स्मारकावर पोहोचल्या. या समाधीचं दर्शन घेताना त्यांनी आवेशाने, क्रोधाने आपले हात त्या समाधीवर आपटले. जयललितांच्या समाधीला त्या हाताने मारतायत की काय असा भास बघणाऱ्याला व्हावा अशी ती कृती होती. तीनवेळा असे हात समाधीवर जोरात आपटताना त्या रागाने काही पुटपुटतही होत्या. एखाद्या तामिळ चित्रपटात शोभेल असंच हे दृश्य होतं.
हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांनी लाईव्ह दाखवला. त्यानंतर शशिकला यांच्या या कृतीचा वेगवेगळा अर्थ लावला जात आहे. पण व्हायरल होणाऱ्या या प्रकाराचं मागचं सत्य वेगळंच आहे. शशिकलांच्या या कृतीमागे एक ऐतिहासिक परंपरा दडली आहे.
जयललितांच्या समाधीवर शशिकला यांनी तीन वेळा थाप का मारली?
इंग्रजी दैनिक 'द हिंदू'ने आज या सगळ्या प्रकारामागची प्रथा सांगणारा वृत्तांत दिला आहे. शशिकला या तामिळनाडूतल्या धिवर या अत्यंत प्रबळ जातीतून आलेल्या आहेत. दक्षिणेतली ही जमात योद्धा म्हणून ओळखली जाते. एखाद्या युद्धावर जाताना शत्रुला संपवण्यासाठी जमिनीवर असे हात मारुन त्वेषाने शपथ घेण्याची परंपरा या जमातीत पूर्वीपासून आहे.
आत्मसमर्पणाआधी शशिकला अम्मांच्या समाधी स्थळावर
वंजीनाम उरैथल या नावाने ओळखली जाणारी ही प्रथा म्हणजे थोडक्यात बदला अशी आहे. जमिनीला आपण धरणीमाता मानतो. त्यामुळे या मातीच्या साक्षीने ही शपथ घेतली जाते. एखाद्या राजाच्या किंवा योद्ध्याच्या मृत्यूचा बदला घेताना सैनिक मृतदेहाच्या तोंडात भाताचा घास ठेवून युद्भभूमीवर आवेशाने निघत. ही कृती म्हणजे बदला घेण्यासाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ याचं निदर्शक असे.
शशिकलांना मोठा धक्का, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांचा तुरुंगवास
शशिकला यांनी त्यांच्याविरोधात जो कट रचला आहे, त्याविरोधात शपथ घेतल्याचं काल एआयडीएमकेच्या ट्विटर हॅण्डलवर स्पष्ट करण्यात आलं होतं. तामिळनाडूच्या इतिहासात अशा इतरही अनेक परंपरा आहेत. काही ठिकाणी मृत व्यक्तीची हाडं किंवा राख ही बदला पूर्ण होईपर्यंत जपून ठेवली जातात.
पनीरसेल्वम यांची हकालपट्टी,पलनीसामी विधीमंडळ नेतेपदी
पाहा व्हिडीओ