चेन्नई : आत्मसमर्पणासाठी बंगळुरुला जाण्याआधी शशिकला नटराजन यांनी चेन्नईतील मरीना बीचवर तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या समाधी स्थळावर श्रद्धांजली वाहिली. यावेळी शशिकला यांनी जयललितांच्या समाधीवर तीन वेळा जोरदार थाप मारली. मात्र शशिकला यांच्या या कृतीमुळे तिथे उपस्थित असलेले अचंबित झाले.


आत्मसमर्पणाआधी शशिकला अम्मांच्या समाधी स्थळावर

हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांनी लाईव्ह दाखवला. त्यानंतर शशिकला यांच्या या कृतीचा वेगवेगळा अर्थ लावला जात आहे. काहींच्या मते, शशिकला यांनी जयललितांवर राग व्यक्त केला. तर शशिकला यांच्या समर्थकांच्या मते त्यांनी या कृतीतून मोठी शपथ घेतली.

शशिकला यांना आजच आत्मसमर्पण करावं लागणार!

उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शशिकला नटराजन यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर बुधवारी शशिकला यांनी बंगळुरु कोर्टात आत्मसमर्पण केलं. सध्या त्यांची रवानगी बंगळुरुच्या परप्पाना अग्रहरा मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली आहे.

शशिकलांना मोठा धक्का, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांचा तुरुंगवास

पण बंगळुरुला रवाना होण्याआधी शशिकला माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या समाधी स्थळावर गेल्या. त्यानंतर काहीतरी पुटपुटत त्यांनी जयललिलांच्या समाधीवर तीन वेळा जोरदार थाप दिली. शशिकलांच्या या कृतीमुळे उपस्थित आश्चर्यचकित झाले होते.


तीन शपथ
शशिकला समर्थकांच्या मते, जयललितांच्या समाधीवर थाप मारुन शपथ घेतली. शशिकला यांनी अनंत अडचणी, कारस्थानी आणि षडयंत्रांवर विजय मिळवण्यासाठी शपथ घेतल्याचं ट्वीट एआयएडीएमकेच्या ट्विटर हॅण्डलवर आहे.

पनीरसेल्वम यांची हकालपट्टी,पलनीसामी विधीमंडळ नेतेपदी

विरोधकांचं म्हणणं आहे की...
दुसरीकडे शशिकला यांच्या विरोधकांच्या मते, जयललितांच्या समाधीवर हात मारुन शशिकला यांनी आपला राग व्यक्त केलं. शशिकला यांची ही कृती अचंबित करणारी होती. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर राग, दु:ख, भय आणि हताशपणा होता.