चेन्नई : ईके पलानीसामी यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एकूण 30 मंत्र्यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पलानीसामी हे गेल्या दोन महिन्यातील तामिळनाडूतले तिसरे मुख्यमंत्री आहेत.


एआयडीएमकेच्या आमदारांनी त्यांची सभागृह नेतेपदी निवड केल्यानंतर, पलानीसामी यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर त्यांना राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण देऊन, दुपारी चार वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आता पलानीसामी यांना येत्या 15 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे.

दरम्यान, यासर्व प्रकरणावर तामिळनाडूच्या राजकीय मैदानातील वादळ तुर्तास क्षमले असले, तरी पन्नीरसेल्वम यांच्या भूमिकेवरही अजून अनेकांचं लक्ष लागून आहे.

जयललितांच्या समाधीवर शशिकला यांनी तीन वेळा थाप का मारली?

उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर शशिकला यांनी ओ पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करुन, निकटवर्तीय पलानीसामी यांची विधीमंडळ नेते म्हणून निवड केली.

https://twitter.com/Madrassan/status/832120649971675136

पलानीसामी आज सकाळी साडे अकरा वाजता राज्यपाल सी विद्यासागर राव यांना भेटण्यासाठी गेले होते. यानंतर राज्यपालांनी पलानीसामी यांना 15 दिवसात सरकार स्थापन करण्याठी आमंत्रण दिलं. पलानीसामी यांच्यासोबत एआयएडीएमकेचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

आत्मसमर्पणाआधी शशिकला अम्मांच्या समाधी स्थळावर

मुख्यमंत्रीपदासाठी पन्नीरसेल्वम आणि पलानीसामींचाही दावा

दरम्यान, शशिकला नटराजन यांचे निकटवर्तीय असलेले पलानीसामी यांनी कालही (बुधवार) राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी दावा होता. त्यानंतर शशिकला यांच्याविरोधात बंड करणारे पन्नीरसेल्वम यांनीही राजभवनात जाऊन मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी सादर केली.

https://twitter.com/ANI_news/status/832118627725778944

शशिकला गटाचं पारडं जड

खरंतर दोन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. परंतु आकड्यानुसार सध्या तरी शशिकला गटाचं पारडं जड दिसत आहे.

तामिळनाडू विधानसभेत एकूण 235 जागा आहेत. सध्या एआयएडीएमके पक्षाकडे एकूण 134  आमदार आहेत. डीएमकेचे 89 आणि उर्वरित जागा काँग्रेससह इतर पक्षांकडे आहेत.

शशिकलांना मोठा धक्का, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांचा तुरुंगवास

जागांची आकडेवारी

शशिकला गटाच्या पलानीसामी यांना 134 पैकी 120 आमदारांचं समर्थन आहे. तर  पन्नीरसेल्वम यांना सुमारे 14 आमदार आणि दहा खासदारांचा पाठिंबा आहे. पन्नीरसेल्वम यांना फार आमदारांचं समर्थन मिळालेलं नाही. पण विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं तर तयार असल्याचं पन्नीरसेल्वम वारंवार बोलत आहेत.

पनीरसेल्वम यांची हकालपट्टी,पलनीसामी विधीमंडळ नेतेपदी

दरम्यान, अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी एका आठवड्यात विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलं आहे. दोन्ही गट दावा करत आहेत, पण राज्यपालांनी अजूनही पत्ते उघडलेले नाहीत.