एक्स्प्लोर

आठवलेंच्या केंद्रीय मंत्रिपदामागील भाजपची गणितं काय?

नवी दिल्ली : मोदी सरकारचा पहिला मोठा विस्तार अखेर पार पडलाय. 10 राज्यातल्या 19 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. पण नव्या मंत्र्यांवर नजर टाकली तर यात कुणी पालिटिकल हेवीवेट फारसे दिसत नाहीत. पण विस्तारात सर्वात प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट आहे ती म्हणजे मोदींचं सोशल इंजिनीयरिंग. त्यामुळेच आजवर महाराष्ट्रात जी गोष्ट अनेक लोक सिरीयसली घ्यायला तयार नव्हते ती प्रत्यक्षात उतरलीय. आठवलेंना मंत्रिपदं देण्यामागची नेमकी काय गणितं आहेत. जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून.   जे दृश्य खरं तर आघाडी सरकारच्या काळात दिसणार होतं, ते इतक्या वर्षानंतर मोदी सरकारमध्ये दिसलं. गेली दहा वर्षे ज्या मंत्रिपदाकडे आठवलेंचे डोळे लागलेले होते, ते स्वप्न अखेर पूर्ण झाले. भावनोत्कट झाल्यानंच की काय या महत्वपूर्ण क्षणाला ते असे गडबडले.     आठवलेंच्या या गडबडण्यावरुन महाराष्ट्रात लगेच अनेक विनोद, कुचेष्टांना सुरुवात झाली. पण त्यावर आठवलेंनी खुलासाही केला आहे. सुरुवातीला त्यांनी आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी चारोळीत मी गडबडलो नाही, आता काँग्रेस-राष्ट्रवादी गडबडेल असं म्हटलं.     अठरा खासदार असलेल्या शिवसेनेला जो आदर मिळाला नाही, तो एकही आमदार- खासदार नसतानाही आठवलेंना मिळाला. याचं एकमेव कारण म्हणजे मोदींचं सोशल इंजीनियरिंग. यूपीच्या निवडणुकीत प्रो-दलित अशी इमेज दाखवायलाही चांगलं, शिवाय मुंबई महापालिकेचं जे घमासान रंगणार आहे त्यातही आठवलेंची साथ मोलाची. अशी गणितं करुन आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय...  

शपथ घेताना रामदास आठवले नाव विसरलेे !

  आठवले त्यांच्या पेहराव, विनोदी शैलीतल्या कवितांमुळे सिरीयस राजकारणी म्हणून पाहिले जात नाहीत. पण आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही कुठेही दलित अत्याचाराची घटना झाल्यावर तिथे पोहचणारा पहिला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्यातल्या या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न भाजपनं केलाय.   आठवलेंना मिळालेलं केंद्रीय मंत्रिपद असेल किंवा महात्मे, छत्रपती संभाजीराजे यांना दिलेली राज्यसभा. भाजप आपल्यावरचा ब्राम्हणी शिक्का पुसायला आतुर झालीय याचंचं हे निदर्शक. विशेषत: मुंडेंच्या जाण्यानंतर भाजपला आपली बहुजनवादी प्रतिमा उभे करायला कष्ट घ्यावे लागतायत. त्यामुळेच अशा प्रत्येक समाजाच्या नेत्यांना जवळ घ्यायचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातही महात्मे, संभाजीराजे यांच्यापेक्षा आठवले हे त्यांच्या समाजाशी अगदी मुळापासून घट्ट जोडलेले आहेत ही गोष्ट कुणीही मान्य करेल.   अर्थात आठवलेंचं मंत्रिपद हे काही भाजपचं औदार्य नाहीय. या बदल्यात आठवलेंच्या नावाचा वापर भाजप जिकडे तिकडे करुन घेणार हे उघड आहे. आंबेडकरांच्या नंतर नवबौद्ध दलित झालेले पहिले केंद्रीय मंत्री अशी त्यांची मांडणी भाजप नेत्यांकडून सुरु आहे आणि पुढच्या काळात मुंबईत ही आणखी वाजवून सांगितली जाईल.  

जावडेकरांचं प्रमोशन, आठवले, भामरेंना मंत्रिपदाची शपथ !

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget