केवायसी खातेदारांनी 5 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेत भरली तरी त्यांची चौकशी होणार नाही, असं आरबीआयने आज म्हटलं आहे. त्यामुळे केवायसीधारक कितीहीवेळा 5 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत भरु शकतील.
केवायसी खातेदार म्हणजे, तुमचे आधार, पॅन वगैरे तुमच्या खात्याला जोडून, तुमची ओळख बँकेला पटवून दिलेली असते.
यापूर्वी खातेदाराने जुन्या नोटा एकरकमीच रक्कम भरावी, ठराविक काळाने 5 -5 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात भरत गेल्यास, त्यांची चौकशी होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र आरबीआयने केवायसी खातेदारांना वगळलं आहे.
तुमच्याकडे जर जुन्या नोटा शिल्लक असेल तर 30 डिसेंबरपर्यंत एकाचवेळी बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. रिझर्व बँकेनेही यासंबंधी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली असून, ज्यांच्याकडे जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी त्या बँकांमध्ये भरण्याची 30 तारखेपर्यंतची शेवटची संधी आहे.
संबंधित बातम्या