अहमदाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाजवळ सरकारचा रिमोट कंट्रोल नाही, असं संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. सरकारचे निर्णय नागपूरच्या संघ कार्यालयातून होत नसल्याचंही सरसंघचालकांनी स्पष्ट केलं आहे. ते शक्य नाही आणि आणि आवश्यकही नाही असंही त्यांनी नमूद केलं.


गुजरातच्या बडोद्यात आयोजित संघ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोहन भागवत बोलत होते. यावेळी त्यांनी संघ सरकारच्या कामात हस्तक्षेप करत नसल्याचं स्पष्ट केलं. विरोधकांकडून नेहमीच भाजप सरकारचा कंट्रोल संघाकडे असल्याची टीका केली जाते. मात्र त्यात काही तथ्य नाही, आम्ही देशाला एक प्रामाणिक काम करणारी व्यक्ती पंतप्रधान म्हणून दिली आहे. त्यामुळे सरकारच्या कामकाजात दखल देण्याची संघाला गरज नसल्याचं सरसंघचालक म्हणाले.

तसंच टीकाकारांना प्रत्युत्तर देत मोहन भागवत यांनी संघ ही एक देशहितासाठी काम करणारी संघटना असल्याचं स्पष्ट केलं. भारत माता की जय हेच संघाचं घोषवाक्य असल्याचं सरसंघचालकांनी यावेळी संघकार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ :